सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथोत्सवाला दिंडीने  शानदार प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:25 AM2017-11-23T00:25:13+5:302017-11-23T00:26:13+5:30

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, शिक्षा अभियान, जिल्हा ग्रंथालय संघ व सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सवास बुधवारी (दि. २२) शानदार प्रारंभ झाला. प्रारंभी सकाळी शहराच्या मध्यवर्ती भागात ग्रंथदिंडी काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात,‘वाचाल तर वाचाल’, ‘‘ग्रंथ हेच गुरु’ अशा घोषणा देत, पोस्टर हाती घेत ग्रंथदिंडी काढण्यात आली.

Dindi is a great start to the public library's Granth Festival | सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथोत्सवाला दिंडीने  शानदार प्रारंभ

सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथोत्सवाला दिंडीने  शानदार प्रारंभ

googlenewsNext

नाशिक : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, शिक्षा अभियान, जिल्हा ग्रंथालय संघ व सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सवास बुधवारी (दि. २२) शानदार प्रारंभ झाला. प्रारंभी सकाळी शहराच्या मध्यवर्ती भागात ग्रंथदिंडी काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात,‘वाचाल तर वाचाल’, ‘‘ग्रंथ हेच गुरु’ अशा घोषणा देत, पोस्टर हाती घेत ग्रंथदिंडी काढण्यात आली. 
ग्रंथदिंडीत शहरातील विविध शाळांनी सक्रिय सहभाग दिला होता. ग्रंथोत्सवाचा उद्घाटन समारंभ सार्वजनिक वाचनालयाच्या लिमये सभागृहात दुपारी पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, सावानाचे कार्यवाह श्रीकांत बेणी, माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, अ‍ॅड. अभिजित बगदे, रामचंद्र काकड, उन्मेश गायधनी, जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे, आशिष डागा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना शीतल सांगळे म्हणाल्या की, सध्या सर्वांचे जीवन गतिमान होत चालले आहे, पण वाचन मागे पडत चालले आहे. 
नवसाहित्यिकांना संधी : दादाजी भुसे 
जिल्हा ग्रंथोत्सवांतर्गत होणाºया विविध कार्यक्र मांच्या माध्यमातून नव्या कवींना आपल्या भावना श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याची तसेच नव्या साहित्यिकांना आपली साहित्यकृती वाचकांपर्यंत पोहोचविण्याची चांगली संधी मिळते, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले. औरंगाबादकर सभागृह येथे ग्रंथोत्सवांतर्गत आयोजित कविसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कवी शरद बोराडे, कमलाकर देसले, लक्ष्मण महाडिक आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाभरातील कवींनी एकाहून एक सरस कविता सादर करीत श्रोत्यांना प्रभावित केले.

Web Title: Dindi is a great start to the public library's Granth Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.