महाशिवरात्रीनिमित्त वावी ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन दिंडी सोहळा : साईभक्तांचे मंगळवारी प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:43 PM2018-02-10T23:43:35+5:302018-02-11T00:43:38+5:30

वावी : महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर मंगळवारी (दि. १३) वावी ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती साई ग्रुपच्या वतीने देण्यात आली.

Dindi celebrations on the occasion of 'Maha Shivaratri' on the occasion of 'Shree Vardi': Shree devotees leave for Mangdhari on Tuesday | महाशिवरात्रीनिमित्त वावी ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन दिंडी सोहळा : साईभक्तांचे मंगळवारी प्रस्थान

महाशिवरात्रीनिमित्त वावी ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन दिंडी सोहळा : साईभक्तांचे मंगळवारी प्रस्थान

Next
ठळक मुद्देअल्पोहार व फराळाचे आयोजन गावातून भव्य मिरवणूक

वावी : दरवर्षाप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर येत्या मंगळवारी (दि. १३) वावी ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती साई आरती ग्रुपच्या वतीने देण्यात आली. गेल्या दहा वर्षांपासून दरवर्षी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर वावी ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन करण्यात येते. एक हजाराहून अधिक भाविक पदयात्रेत सहभागी होत असतात. दुशिंगपूर, सायाळे, जवळके यामार्गे जाणाºया पदयात्रेत ठिकठिकाणी चहापाणी, अल्पोहार व फराळाचे आयोजन करण्यात आले आहे. पदयात्रेकरुंबरोबरच दिंडीत रथ असतो. या रथाची सोमवारी (दि. १२) रोजी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर मंगळवारी (दि. १३) पहाटे ५ वाजता दिंडीचे शिर्डीकडे प्रस्थान होणार आहे. जास्तीत जास्त भाविकांनी पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन साई आरती गु्रपचे आशिष माळवे, कन्हैयालाल भुतडा, सोमनाथ आनप, जगदीश पटेल, संदीप राजेभोसले, संतोष भोपी, ओंकार धूत, जयेश मालपाणी, दिलीप भरीतकर, कौशिक सोमाणी, गणेश कर्पे, अनिल आवारे, मंदार केसकर, सुधीर ओझा, किशोर जाधव, सागर कर्पे आदींनी केले आहे.

Web Title: Dindi celebrations on the occasion of 'Maha Shivaratri' on the occasion of 'Shree Vardi': Shree devotees leave for Mangdhari on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.