एचएएल कामगार संघटना सरचिटणीसपदी ढोमसे विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:47 AM2018-06-16T00:47:38+5:302018-06-16T00:47:38+5:30

एचएएल कामगार संघटनेच्या  ३१ जागांसाठी झालेल्या चुरशीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत सरचिटणीसपदी श्री समर्थशक्ती पॅनलचे सचिन ढोमसे १४७५ मते मिळवून विजयी झाले.

 Dhamsi won the general secretary of the HAL trade union | एचएएल कामगार संघटना सरचिटणीसपदी ढोमसे विजयी

एचएएल कामगार संघटना सरचिटणीसपदी ढोमसे विजयी

googlenewsNext

ओझर /ओझर टाउनशिप : येथील एचएएल कामगार संघटनेच्या  ३१ जागांसाठी झालेल्या चुरशीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत सरचिटणीसपदी श्री समर्थशक्ती पॅनलचे सचिन ढोमसे १४७५ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी सत्ताधारी गटाचे उमेदवार संजय कुटे यांचा ४४४ मतांनी पराभव केला.  कामगार संघटनेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाले. मतदानानंतर सांयकाळी ६ वाजता मतमोजणी सुरू झाली. मतपत्रिकांचे गठ्ठे लाऊन झाल्यानंतर ८ वाजेला सरचिटणीसपदाच्या मतमोजणीस प्रारंभ झाला. त्यामध्ये श्री समर्थशक्ती पॅनलचे उमेदवार सचिन ढोमसे यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती.  ही आघाडी शेवटपर्यंत तशीच टिकून होती. त्यांचे प्रतिस्पर्धी सत्ताधारी गटाच्या श्री आपला पॅनलचे सरचिटणीसपदाचे उमेदवार संजय कुटे हे दुसऱ्या स्थानावर, तर जागृती पॅनलचे उमेदवार तिसºया स्थानावर होते. ही स्थिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत तशीच होती. सचिन ढोमसे हे १४७५ मते मिळवून विजयी झाले. पराभूत उमेदवार सत्ताधारी गटाचे संजय कुटे यांना १०३१, जागृती पॅनलचे अनिल मंडलिक यांना ७४५ मते मिळाली .  सरचिटणीसपदी ढोमसे विजयी झाल्याचे जाहीर होताच श्री समर्थशक्ती पॅनलचे समर्थक, कार्यकर्ते व हितचिंतक यांनी मेनगेटवर एकत्र येत गुलाल उधळून जल्लोष केला.

Web Title:  Dhamsi won the general secretary of the HAL trade union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक