ईपीएफओच्या योजनांचा लाभ घ्यावा देवेंद्र सोनटक्के : लखमापूर येथे कार्यशाळेचे आयोजन; मान्यवरांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 11:45 PM2017-12-02T23:45:39+5:302017-12-03T00:42:05+5:30

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघठन (ईपीएफओ) कार्यालयातर्फे कामकाज डिजिटल प्रणालीद्वारे आॅनलाइन होत आहे.

Devendra Sonatkke: Organizing a workshop at Lakhmapur; Participation of dignitaries | ईपीएफओच्या योजनांचा लाभ घ्यावा देवेंद्र सोनटक्के : लखमापूर येथे कार्यशाळेचे आयोजन; मान्यवरांचा सहभाग

ईपीएफओच्या योजनांचा लाभ घ्यावा देवेंद्र सोनटक्के : लखमापूर येथे कार्यशाळेचे आयोजन; मान्यवरांचा सहभाग

googlenewsNext

दिंडोरी : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघठन (ईपीएफओ) कार्यालयातर्फे कामकाज डिजिटल प्रणालीद्वारे आॅनलाइन होत आहे. ईपीएफओ सदस्यांसाठी विविध योजना आखण्यात आल्या असून, त्याचा फायदा कर्मचारी व आस्थापना यांनी घ्यावा, असे आवाहन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघठन नाशिक विभागाचे सहायक आयुक्त देवेंद्र सोनटक्के यांनी केले.
दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील एव्हरेस्ट इंडिया लिमिटेड या कंपनीच्या सभागृहात तालुक्यातील विविध आस्थापनांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघठनच्या (ईपीएफओ) विविध योजना व आॅनलाइन कामकाज प्रणालीची माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अधिकारी अनिल ढोकले, सुनील बकरे, अरुण दयाल यांनी प्रधानमंत्री रोजगार योजना, ई-केवायसी, आधार यूएएन लिंकिंग, यूएएन अ‍ॅक्टिव्हेशन आदींबाबत मार्गदर्शन केले. आधार सिडिंगबाबत सीएससीचे जिल्हा व्यवस्थापक स्वप्नील भालेराव यांनी मार्गदर्शन केले. पीएफ विभागाने थेट तालुका पातळीवर येत पीएफच्या विविध योजनांची माहिती सविस्तरपणे दिली. याबाबत एव्हरेस्ट कंपनीचे व्यवस्थापक पीयूष तिवारी यांनी आभार मानले. यावेळी एव्हरेस्टचे अधिकारी के. एल. कुटे, संदीप देशमुख आदींसह विविध आस्थापनांचे अधिकारी, कामगार, ठेकेदार, प्रतिनिधी, सीएससी केंद्रचालक उपस्थित होते.

Web Title: Devendra Sonatkke: Organizing a workshop at Lakhmapur; Participation of dignitaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Taxकर