चोरीच्या दुचाकी विकणाऱ्या संशयितास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 01:07 AM2018-03-25T01:07:01+5:302018-03-25T01:07:01+5:30

शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी दुचाकींची चोरी करून विकणाºया संशयितास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ वैष्णव चंद्रकांत सूर्यवंशी (२२, रा. मुंजवाड, ता. सटाणा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे़

Detainees arrested for theft bikes | चोरीच्या दुचाकी विकणाऱ्या संशयितास अटक

चोरीच्या दुचाकी विकणाऱ्या संशयितास अटक

googlenewsNext

नाशिक : शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी दुचाकींची चोरी करून विकणाºया संशयितास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ वैष्णव चंद्रकांत सूर्यवंशी (२२, रा. मुंजवाड, ता. सटाणा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे़  दुचाकीवर बनावट नंबर प्लेट लावून दुचाकीचोर फिरत असून, तो सीबीएस परिसरात येणार असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेतील युनिट एक मधील पोलीस शिपाई स्वप्निल जुंद्रे यांना मिळाली होती़ त्यानुसार गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, दीपक गिरमे, महेश कुलकर्णी, उपनिरीक्षक चंद्रकांत पळशीकर, जाकीर शेख, पोपट कारवाळ, बाळासाहेब दोंदे, विशाल काटे, शांताराम महाले यांनी सीबीएस परिसरात सापळा रचून वैष्णव सूर्यवंशी याला अटक केली़ गुन्हे शाखेच्या अधिकाºयांनी संशयिताची कसून चौकशी केली असता त्याच्याकडील बजाज डिस्कव्हर दुचाकी ही सटाणा येथील भाक्षीरोड परिसरातील महादेव मंदिराजवळून चोरल्याची कबुली दिली. या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने संशयित सूर्यवंशी यास सटाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़

Web Title: Detainees arrested for theft bikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.