ठेवीदारांची दोन कोटींची फसवणूक ट्विंकल स्टारकडून अपहार : गुन्हा नाशिक आर्थिक शाखेकडे वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:06 AM2018-03-09T00:06:04+5:302018-03-09T00:06:04+5:30

लासलगाव : सिट्रस चेक इन्स व रॉयल ट्विंकल स्टार या कंपनीचे चेअरमन ओमप्रकाश गोयंका व त्यांचे सहकारी यांच्याविरुद्ध एक कोटी ९० लाख रु पयांची फसवणूक प्रकरणी दाखल गुन्हा नाशिक येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

Depositors' fraud of two crores Twinkle Star wrecks: Crime class to Nashik Financial Branch | ठेवीदारांची दोन कोटींची फसवणूक ट्विंकल स्टारकडून अपहार : गुन्हा नाशिक आर्थिक शाखेकडे वर्ग

ठेवीदारांची दोन कोटींची फसवणूक ट्विंकल स्टारकडून अपहार : गुन्हा नाशिक आर्थिक शाखेकडे वर्ग

Next
ठळक मुद्देमोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता एजंटांना अटक करून त्यांची वाहने व संपत्ती जप्त करावी

लासलगाव : परिसरातील सुशिक्षित एजंटांना मोठे कमिशन देऊन काही वर्षात गुंतवणूक केलेल्या रकमेवर घसघशीत परतावा मिळेल, असे स्वप्नरंजन दाखविणाºया सिट्रस चेक इन्स व रॉयल ट्विंकल स्टार या कंपनीचे चेअरमन ओमप्रकाश गोयंका व त्यांचे इतर सहकारी यांच्याविरुद्ध ठेवीदारांची सुमारे एक कोटी ९० लाख रु पयांची फसवणूक व अपहारप्रकरणी लासलगाव पोलीस कार्यालयात मागील बुधवारी दाखल झालेला गुन्हा नाशिक येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची वाढती संख्या पाहता या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. यात मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी व्यक्त केली आहे. सुरुवातीला तीन-चार वर्षांपूर्वी ट्विंकल या नावाने गुंतवणूकदार, राष्ट्रीयीकृत बँकेत ठेव ठेवणारे ठेवीदार, तसेच महिला व ज्येष्ठ नागरिक यांना मोठ्या परताव्याचा भूलभुलय्या दाखविण्यात आला. लासलगाव परिसरातील कमिशन घेऊन महागड्या गाड्या खरेदी करून भुलविणारे एजंटांनी कमिशनकरिता या गुंतवणूकदारांना आर्थिक संकटात आणले आहे. या एजंटांना तातडीने पोलिसांनी अटक करून त्यांची वाहने व संपत्ती जप्त करावी, अशी मागणी गुंतवणूकदारांनी केली आहे. इमू, केबीसीनंतर ढोकेश्वरप्रकरणी लासलगाव परिसरातल्या गुंतवणूक करणाºयांची मोठी रक्कम मिळेल, असे आमिष दाखवत या गुन्हा दाखल झाल्यानंतर मोठी फसवणूक गुंतवणूकदार अडचणीत आले आहेत.

Web Title: Depositors' fraud of two crores Twinkle Star wrecks: Crime class to Nashik Financial Branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा