निवृत्तिनाथांच्या जयघोषात पालखीचे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 06:10 PM2019-06-18T18:10:04+5:302019-06-18T18:11:32+5:30

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांचा जयघोष करत हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने वाजत-गाजत निवृत्तिनाथांच्या पालखीने विठूमाउलीच्या दर्शनासाठी मंगळवारी (दि. १८) पंढरपूरकडे प्रस्थान केले आणि गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली पायी दिंडी सोहळ्याची प्रतीक्षाही संपली.

The departure of Palkhi in the Jivongas of Nivittinath | निवृत्तिनाथांच्या जयघोषात पालखीचे प्रस्थान

त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ यांच्या पायी दिंडी पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. या दिंडी सोहळ्यात सहभागी झालेले हजारो वारकरी.

Next
ठळक मुद्देपंढरपूरकडे मार्गस्थ : हजारो वारकरी सहभागी; ४५० किमीचा प्रवास

त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांचा जयघोष करत हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने वाजत-गाजत निवृत्तिनाथांच्या पालखीने विठूमाउलीच्या दर्शनासाठी मंगळवारी (दि. १८) पंढरपूरकडे प्रस्थान केले आणि गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली पायी दिंडी सोहळ्याची प्रतीक्षाही संपली.
संत निवृत्तिनाथ पालखी सोहळ्यासाठी हजारो वारकरी त्र्यंबकेश्वरी दाखल झाले होते. मंगळवारी सकाळी निवृत्तिनाथांच्या पादुका मंदिराबाहेर आणण्यात आल्या. पूजा, आरती, अभंग आदी विधी पार पाडल्यानंतर वारकऱ्यांनी संत निवृत्तिनाथांचा जयघोष करत परिसर दणाणून सोडला. पुंडलिक वरदा श्रीहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, संत निवृत्तिनाथ महाराज की जय असा जयजयकार करत रथ हलला. पालखी रथाला सुनील अडसरे यांच्या बैलजोडीला मान मिळाला, तर रथाचे सारथ्य बाळासाहेब अडसरे व अजय अडसरे हे बंधू करत आहेत. पायी दिंडीने प्रवास करणे हे केवळ मौज मजा करून प्रवास नव्हे, तर ती एक साधना आहे. अशी धारणा असल्याने या दिंडीत हजारो वारकरी सहभागी झाले आहेत. सकाळी कुशावर्ताजवळ रथ आल्यानंतर नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांनी चांदीच्या पादुका डोक्यावर घेऊन कुशावर्त तीर्थावर सपत्नीक पूजा केली. यावेळी सर्व नगरसेवकांसह मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे उपस्थित होते. तेथून भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन पालखी नाशिककडे मार्गस्थ झाली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वारकºयांच्या नातेवाइकांशी भेटीगाठीचा कार्यक्रम पार पडला. हा दिंडी सोहळा २४ दिवसांच्या पायी प्रवासाचा राहणार असून, सुमारे ४५० किमी अंतर कापणार आहे. भावभक्तिमय वातावरणात निघालेल्या या पालखीचे ठिकठिकाणी स्वागत केले जाणार असून, निर्मळ वारी उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचादेखील संदेश दिला जाणार आहे.
आज नाशिकला आगमन
दुपारी १२.३० वाजता पालखीने त्र्यंबकेश्वर सोडले. मंगळवारी पालखीचा पहिला मुक्काम नाशिक येथे सातपूरला पडणार आहे. २० जूनला पालखीचा पळसे येथे मुक्काम होईल. पंढरपूर वारी १२ जुलै रोजी असल्याने १२ ते १५ जुलैदरम्यान पालखीचा मुक्काम पंढरपूर येथे त्र्यंबकेश्वर फडावर राहील. २४ दिवसांचा प्रवास केल्यानंतर वारी करून पालखीचा परतीचा प्रवास १६ जुलैपासून सुरू होईल. सतराव्या दिवशी पालखी त्र्यंबकेश्वरला येईल.
 

Web Title: The departure of Palkhi in the Jivongas of Nivittinath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.