पुरातत्व विभाग : नाशिक विभागातील २१ संस्थांमधील कार्यकर्त्यांचा शासनाकडून गौरव स्वच्छतादूतांच्या कर्तृत्वाला सत्काराचे ‘कोंदण’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 10:13 PM2017-11-19T22:13:53+5:302017-11-19T22:16:03+5:30

मनमाड : राज्य संरक्षित व राष्टÑीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेल्या गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी पुरातत्व विभागाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन गडांची स्वच्छता व स्वच्छतेची जनजागृती करणाºया संस्थांच्या कार्याची शासनाकडून दखल घेण्यात आली आहे. नाशिक विभागातील पाच किल्ल्यांवर स्वच्छतेसाठी योगदान देणाºया २१ संस्था व संघटनांचा मुंबई येथे ‘गड संरक्षण स्वच्छता सन्मान’ सोहळ्यामध्ये गौरव करण्याचा निर्णय पुरातत्व विभागाकडून घेण्यात आला आहे.

 Department of Archeology: Giving the honor of 'Swargas' by the government workers of 21 organizations in Nashik division, 'Kandan'! | पुरातत्व विभाग : नाशिक विभागातील २१ संस्थांमधील कार्यकर्त्यांचा शासनाकडून गौरव स्वच्छतादूतांच्या कर्तृत्वाला सत्काराचे ‘कोंदण’!

अनकार्ई-टणकाई किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविताना मनमाड इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष मुराद शेख व त्यांचे सहकारी.

googlenewsNext
ठळक मुद्दे नाशिक विभागातील २१ संस्थांमधील कार्यकर्त्यांचा शासनाकडून गौरवस्वच्छतादूतांच्या कर्तृत्वाला सत्काराचे ‘कोंदण’!

गिरीश जोशी ।
मनमाड : राज्य संरक्षित व राष्टÑीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेल्या गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी पुरातत्व विभागाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन गडांची स्वच्छता व स्वच्छतेची जनजागृती करणाºया संस्थांच्या कार्याची शासनाकडून दखल घेण्यात आली आहे. नाशिक विभागातील पाच किल्ल्यांवर स्वच्छतेसाठी योगदान देणाºया २१ संस्था व संघटनांचा मुंबई येथे ‘गड संरक्षण स्वच्छता सन्मान’ सोहळ्यामध्ये गौरव करण्याचा निर्णय पुरातत्व विभागाकडून घेण्यात आला आहे.
महाराष्टÑ अगदी प्राचीन काळापासून वीरांची भूमी म्हणून ओळखला जातो. राज्यातील गड-किल्ले हे जनतेच्या अस्मितेचे प्रतीक बनले आहेत. या किल्ल्यांची देखभाल, जतन व संवर्धन करणे, त्यांची स्वच्छता ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. या दृष्टिकोनातून महाराष्टÑ शासनातर्फे १६ सप्टेंबर २०१६ ते १६ आॅक्टोबर २०१६ या कालावधीमध्ये राज्य संरक्षित स्मारक व राष्टÑीय संरक्षित स्मारकांवर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यास चांगला प्रतिसाद मिळाल्याने स्थानिक पातळीवरील स्वयंसेवी संस्था तसेच शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम व स्वच्छतेसाठी जनजागृती करण्यात आली. या उपक्रमामुळे प्राचीन वास्तुशास्त्राचे नमुने, ऐतिहासिक स्थळे आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या विभागातील पाच किल्ले व गडांवर स्वच्छतेचा जागर घुमला. पुरातत्व विभाग नाशिक यांच्या अंतर्गत राज्य संरक्षित स्मारक व राष्टÑीय संरक्षित स्मारक असलेल्या मनमाडजवळील अनकाई-टणकाई किल्ला, मालेगाव किल्ला, गाळण (ता. मालेगाव) येथील किल्ला, खर्डा (जि. अहमदनगर) येथील किल्ला, पारोळा (जि. जळगाव) या पाच किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. किल्ला परिसरातील घाण कचरा, प्लॅस्टिक रिकामी पाकिटे, कॅरीबॅग गोळा करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली.
पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. श्रीकांत घारपुरे, तंत्र सहायक अमोल गोटे, जतन सहायक रमेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अनकाई-टणकाई किल्ल्यांवरील स्वच्छता मोहिमेसाठी महाराष्टÑ इंजिनिअर्स असोसिएशन मनमाड शाखा, अहल्याबाई होळकर विद्यालय, मनमाड महाविद्यालय, मनमाड पालिका, अनकाई ग्रामपंचायत यांनी सहभाग घेतला होता. उपक्रम यशस्वी करण्याच्या कार्याची शासनाकडून दखल घेण्यात आली आहे. मुंबई येथे दि. २३ नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक कार्य विभाग मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या गड संवर्धन सन्मान सोहळ्यात नाशिक विभागातील २१ संस्था व संघटनांचा गौरव करण्यात येणार आहे.

राज्य संरक्षित स्मारक व राष्टÑीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित असलेल्या विभागातील पाच गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवून जनजागृती करणाºया २१ दुर्गप्रेमी व सेवाभावी संस्थांचा मुंबई येथे गड संवर्धन सन्मान सोहळ्यात शासनाकडून गौरव करण्यात येणार आहे.
- डॉ. श्रीकांत घारपुरे, सहायक संचालक, पुरातत्व विभाग.

Web Title:  Department of Archeology: Giving the honor of 'Swargas' by the government workers of 21 organizations in Nashik division, 'Kandan'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.