देवळाली छावणी परिषद उपाध्यक्षपदी धिवरे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 01:41 AM2019-01-10T01:41:58+5:302019-01-10T01:42:12+5:30

देवळाली कॅम्प : देवळाली छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजप-रिपाइं आठवले गट युतीच्या नगरसेविका प्रभावती धिवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Deolali Cantonment Council | देवळाली छावणी परिषद उपाध्यक्षपदी धिवरे बिनविरोध

देवळाली छावणी परिषद उपाध्यक्षपदी धिवरे बिनविरोध

googlenewsNext

देवळाली कॅम्प : देवळाली छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजप-रिपाइं आठवले गट युतीच्या नगरसेविका प्रभावती धिवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
देवळाली छावणी परिषदेच्या उपाध्यक्षा मीना करंजकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपाध्यक्ष पदासाठी बुधवारी सकाळी ११ वाजता छावणी परिषदेची विशेष सभा ब्रिगेडियर पी. रमेश यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. उपाध्यक्ष पदासाठी नगरसेविका प्रभावती धिवरे यांच्या नावाची सूचना नगरसेवक दिनकर आढाव यांनी केली. त्याला नगरसेवक सचिन ठाकरे यांनी अनुमोदन दिले. सभेला नगरसेविका मीना करंजकर, कावेरी कासार, आशा गोडसे, बाबुराव मोजाड, भगवान कटारिया, हेल्थ आॅफिसर ब्रिगेडियर ए. के. श्रीवास्तव, कर्नल कमलेश चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित उपाध्यक्षा प्रभावती धिवरे यांचा सत्कार रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी धिवरे, करंजकर यांनी मनोगत व्यक्त केले. धिवरे यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

Web Title: Deolali Cantonment Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.