देवळा तालुक्यात कांदा चोरीस...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 01:00 PM2018-02-07T13:00:12+5:302018-02-07T13:00:57+5:30

खर्डे - देवळा तालुक्यातील वरवंडी येथील पांडुरंग सुखदेव शिंदे यांच्या शेतातून चोरट्यांनी जवळपास २० ते २५ क्विंटल रांगडा लाल कांदा चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून त्यामुळे शेतकºयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

In Deola taluka onion thieves ...! | देवळा तालुक्यात कांदा चोरीस...!

nas

Next

खर्डे - देवळा तालुक्यातील वरवंडी येथील पांडुरंग सुखदेव शिंदे यांच्या शेतातून चोरट्यांनी जवळपास २० ते २५ क्विंटल रांगडा लाल कांदा चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून त्यामुळे शेतकºयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. निर्यातमुल्य शून्य होताच कांदा भाव वाढत चालल्याने या चोरीमुळे शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घेऊन अटक करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात आली आहे. देवळा तालुक्यातील वरवंडी येथील प्रगतिशील शेतकरी पांडुरंग सुखदेव शिंदे यांचा गावालगत मळा आहे. त्यांनी आपल्या शेतातील रांगडा लाल कांदा काढून शेतात गरी (एका ठिकाणी साठवून ) करून ठेवला होता. शिंदे बुधवारी बाजार समितीत सदर कांदे विक्रीसाठी घेऊन जाणार होते. आज सकाळी ते आपल्या शेतावर गेले असता त्यांना गरीवरून कांदा चोरट्यांनी भरून नेल्याचे समजताच त्यांनी ही माहिती गावातील पोलीस पाटलांना दिली. शिंदे यांचा आजच्या बाजारभावानुसार ५० हजार रूपयांचा कांदा होता. या घटनेमुळे शेतकरी वर्ग भयभीत झाला असून , या घटनेचा पोलिसांनी छडा लावून कांदा चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या कांद्याला बºयापैकी बाजारभाव असल्याने शेतकºयांना दोन पैसे मिळत आहे त्यात अशी चोरी सारखी घटना घडत असेल तर त्यांनी न्याय कोणाकडे मागावा अशी शेतकºयांची अवस्था झाली आहे.

Web Title: In Deola taluka onion thieves ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक