हेल्मेट सक्ती बरोबर एलईडी बल्ब वाहनांवर कारवाई करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 07:18 PM2019-02-02T19:18:01+5:302019-02-02T19:20:01+5:30

मानोरी : नाशिक जिल्ह्यात १ फेब्रुवारी पासून दुचाकी स्वारांना हेल्मेट सक्ती करण्यासाठी पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन केले जात असून विना परवाना वाहन चालविणे, वाहन चालविताना हेल्मेट न घालणे तसेच चार चाकी वाहनाच्याचालकाने सीट बेल्टचा वापर न करणे या सर्वांवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून मार्गदर्शन व जनजागृती करण्यात येत आहे.

Demand to take action against LED bulb vehicles with Helmet compelled | हेल्मेट सक्ती बरोबर एलईडी बल्ब वाहनांवर कारवाई करण्याची मागणी

हेल्मेट सक्ती बरोबर एलईडी बल्ब वाहनांवर कारवाई करण्याची मागणी

Next
ठळक मुद्देहेल्मेटसक्ती च्या कारवाई बरोबर बेकायदेशीर पणे बसविलेल्या एलईडी बल्बच्या वाहनांवर कारवाई करणे गरजेचे

मानोरी : नाशिक जिल्ह्यात १ फेब्रुवारी पासून दुचाकी स्वारांना हेल्मेट सक्ती करण्यासाठी पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन केले जात असून विना परवाना वाहन चालविणे, वाहन चालविताना हेल्मेट न घालणे तसेच चार चाकी वाहनाच्याचालकाने सीट बेल्टचा वापर न करणे या सर्वांवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून मार्गदर्शन व जनजागृती करण्यात येत आहे.
परंतु मागील कित्येक दिवसापासून बाजारात दोन चाकी आणि चार चाकी वाहनांना पांढरे शुभ्र एलईडी बल्ब स्वस्तात बसवून मिळत असल्याने वाहनांच्या मुख्य बल्बचा वापर दिवसेंदिवस कमी होत चालला असून रात्रीच्या वेळी प्रवास करताना ग्रामीण भागातील रस्ते अरु ंद तसेच रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपाणी मोठ्या प्रमाणात अतिक्र मण केल्याने पांढऱ्या शुभ्र पडणाºया एलईडी मूळे समोरु न येणाºया वाहनांचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वारांच्या अपघातात वाढ होत आहे. दुचाकी स्वार आपल्या वाहनाला दिशादर्शक असलेल्या बल्ब च्या ठिकाणी तीव्र पांढºया शुभ्र प्रकाशाचे एलईडी बल्ब सर्रास पणे बसवून प्रवास करतात. याचा परिणाम रात्री च्या वेळी प्रवास करताना होत असून पोलीस प्रशासनाने हेल्मेटसक्ती च्या कारवाई बरोबर बेकायदेशीर पणे बसविलेल्या एलईडी बल्बच्या वाहनांवर कारवाई करणे गरजेचे झाले आहे.
 
Web Title: Demand to take action against LED bulb vehicles with Helmet compelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस