चारा छावण्या सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 06:42 PM2019-02-05T18:42:03+5:302019-02-05T18:42:33+5:30

सिन्नर तालुक्यात १९७२ पेक्षाही भयावह दुष्काळ असून, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यासह दुष्काळावर तातडीने उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

Demand for fodder camps | चारा छावण्या सुरू करण्याची मागणी

सिन्नर तालुक्यात दुष्काळी उपाययोजना राबविण्यात याव्यात या मागणीचे निवेदन तहसीलदार नितीन गवळी यांना देताना राष्टÑवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, नामदेव कोतवाल. समवेत प्रमोद सांगळे, प्रवीण जगताप, निवृत्ती पवार, सुनील गोर्डे, संदीप भालेराव आदी.

googlenewsNext

सिन्नर : तालुक्यात १९७२ पेक्षाही भयावह दुष्काळ असून, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यासह दुष्काळावर तातडीने उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
राष्टÑवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, शहराध्यक्ष नामदेव कोतवाल, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष कैलास झगडे यांनी दुष्काळी उपाययोजना राबविण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार नितीन गवळी यांना दिले. दुष्काळ उपाययोजनांची अजूनही अंमलबजावणी नाही. मार्चपर्यंत पुरेल इतकाच चारा
असून, पशुधन वाचविण्यासाठी मंडल स्तरावर चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात, लाल कांद्याला ५० पैसे ते ३.५० रुपये प्रतिकिलो दर मिळत असून, किमान दोन हजार रुपये क्विंटलप्रमाणे खरेदी व्हावी, मागणीनुसार टँकरने पाणीपुरवठा करावा, रोजगार हमीची प्रभावी अंमलबजावणी करावी. जेणेकरून मजुरांचे स्थलांतर होणार नाही. उपाययोजनांची अंमलबजावणी न झाल्यास तहसील कार्यालयाच्या आवारात मुलाबाळांसह बिºहाड मांडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी प्रमोद सांगळे, प्रवीण जगताप, निवृत्ती पवार, सुनील
गोर्डे, संदीप भालेराव, मुक्तार
पिंजारी, संतोष कदम, जयराम
शिंदे, तानाजी सानप, महेश गुंबाडे, कैलास वाघ, युनूस शेख, बाबाजी शेळके, रामराव आरोटे आदी उपस्थित होते.

Web Title: Demand for fodder camps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.