आरोपींना मृत्युदंड देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:36 AM2018-01-19T00:36:18+5:302018-01-19T00:43:03+5:30

नाशिक : अतिशय दुर्मिळातील दुर्मीळ घटना म्हणूनच या सोनईच्या घटनेकडे पाहता येईल. सहाही आरोपींनी नियोजनबद्ध व थंड डोक्याने कट रचून सचिन घारूसह तिघांचे हत्याकांड केल्याने, त्यांचे हे कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे तर आहेच, परंतु देशात व राज्यात दुर्दैवाने फोफावत चाललेल्या जातीयवादाला खतपाणी घालणारे असल्यामुळे अशा प्रवृत्तींना कायद्याने ठेचून काढण्यासाठी सोनई हत्याकांडातील सहाही आरोपींना अधिकाधिक म्हणजेच मृत्युदंडाची शिक्षा द्यावी, अशा शब्दांत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला. सुमारे अर्धातास चाललेल्या न्यायालयीन प्रक्रियेत न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत शनिवारी (दि.२०) खटल्याचा निकाल जाहीर करण्याची घोषणा केली.

Demand for the death penalty | आरोपींना मृत्युदंड देण्याची मागणी

आरोपींना मृत्युदंड देण्याची मागणी

Next
ठळक मुद्देसोनई हत्याकांडात दोन्ही बाजूंनी युक्तिवाद शनिवारी न्यायालय देणार निकाल

नाशिक : अतिशय दुर्मिळातील दुर्मीळ घटना म्हणूनच या सोनईच्या घटनेकडे पाहता येईल. सहाही आरोपींनी नियोजनबद्ध व थंड डोक्याने कट रचून सचिन घारूसह तिघांचे हत्याकांड केल्याने, त्यांचे हे कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे तर आहेच, परंतु देशात व राज्यात दुर्दैवाने फोफावत चाललेल्या जातीयवादाला खतपाणी घालणारे असल्यामुळे अशा प्रवृत्तींना कायद्याने ठेचून काढण्यासाठी सोनई हत्याकांडातील सहाही आरोपींना अधिकाधिक म्हणजेच मृत्युदंडाची शिक्षा द्यावी, अशा शब्दांत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला. सुमारे अर्धातास चाललेल्या न्यायालयीन प्रक्रियेत न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत शनिवारी (दि.२०) खटल्याचा निकाल जाहीर करण्याची घोषणा केली.
संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाºया अहमदनगर जिल्ह्णातील सोनई हत्याकांडाची अंतिम सुनावणी गुरुवारी (दि.१८) येथील जिल्हा व सत्र न्यायालयात करण्यात आली. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद संपुष्टात आल्यानंतर न्यायालयाने आरोपीच्या पिंजºयात उभ्या असलेल्या सहाही संशयितांना ‘तुम्हाला काही सांगायचे काय’ अशी विचारणा केल्यावर दोघांनी ‘आपण निर्र्दोष असल्याने दया करावी’ अशी विनवणी न्यायालयाला केली, तर एकाने ‘सोमवारपासून आपण तुरुंगात उपोषण करीत असून, उपस्थित केलेल्या मुद्दावर न्यायालयाने न्याय द्यावा’ अशी विनंती केली. सुमारे अर्धातास चाललेला हा अंतिम युक्तिवाद ऐकण्यासाठी संपूर्ण कोर्ट हॉल वकील, पक्षकार, प्रसिद्धीमाध्यमे व पोलिसांच्या गर्दीने खच्चून भरला होता. जातीयव्यवस्थेवर अवलंबून सदरचे प्रकरण असल्यामुळे त्याचे अन्य पडसाद उमटू नये, म्हणून अहमदनगर ऐवजी नाशिकच्या जिल्हा न्यायालयात गेल्या वर्षापासून सदर खटल्याची सुनावणी केली जात आहे. सोमवार, दि. १५ जानेवारी रोजी न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने सोनईच्या तिहेरी हत्याकांडातील सात पैकी रमेश विश्वनाथ दरंदले, प्रकाश विश्वनाथ दरंदले, पोपट ऊर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले, गणेश ऊर्फ प्रवीण पोपट दरंदले, अशोक सुधाकर नवगिरे, संदीप माधव कुºहे यांना न्यायालयाने दोषी धरले होते, तर रोहिदास फलके याला निर्दोेष ठरविले होते. न्यायालयाने या खटल्याचा निकाल गुरुवारी देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे साºयांचेच लक्ष खटल्याकडे लागले होते.
सकाळीच पोलीस बंदोबस्तातच सर्व सहाही आरोपींना न्यायालयात आणण्यात आले होते. अतिरिक्त सत्र न्यायधीश आर. आर. वैष्णव यांच्या न्यायालयात ११ वाजेपासूनच गर्दी झाली होती. साधारणत: ११ वाजून पन्नास मिनिटांनी न्यायधीशांचे आगमन झाले व त्यानंतर लागलीच सुनावणीला सुरुवात झाली. आरोपींच्या वकिलांनी प्रारंभी युक्तिवाद करताना आरोपींमध्ये काही तरुण व वृद्धांचा समावेश असल्याने त्यांच्या भावी आयुष्याचा विचार करता, कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी विनंती केली. संपूर्ण खटल्यात सरकारी पक्ष कोठेही महत्त्वाचा पुरावा सिद्ध करू शकलेले नाहीत तसेच या खटल्यात कोणत्या आरोपीने कोणाला मारले याचा उलगडा झालेला नाही. निव्वळ परिस्थितीजन्य पुरावा आरोपींना शिक्षेसाठी पुरेसा नसून तसे झाल्यास तो त्यांच्यावर अन्याय ठरेल असे न्यायालयाला आवर्जुन सांगितले.
सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अर्धातास युक्तिवाद करताना आरोपींच्या वकिलांचा प्रत्येक मुद्दा खोडून काढला व संपूर्ण खटल्याचा तपास करताना आरोपींच्या कट कारस्थानाचे समोर आलेले परिस्थितीजन्य मुद्दे मांडले. आरोपींनी रचलेले कटकारस्थान स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येशी मिळते जुळते असल्याचे सांगत सर्र्वाेच्च न्यायालयात गाजलेल्या बच्चनसिंग विरुद्ध पंजाब सरकार व मच्छिसिंग विरुद्ध पंजाब सरकार या खटल्याचे संदर्भ दिले. दुर्मिळातील दुर्मिळ म्हणून सर्वोच्च न्यायालयाने या दोन्ही खटल्यांचा निकाल देताना जे वर्णन केले आहे, त्याच्याशी साध्यर्म्य सदरचे प्रकरण असल्याचे ते म्हणाले. देशात व राज्यात जातीयवादाच्या घटना घडत असून, सदरची घटना त्याचेच द्योतक आहे. जातीयवादाचा मोठा धोका निर्माण होत असेल तर कायद्याच्या आधारेच त्यांना तुडविले गेल्यास पुन्हा तसे कृत्य करण्यास कोणी धजावणार नाही, त्यामुळे सर्व आरोपींना जास्तीत जास्त मृत्युदंडाची शिक्षा द्यावी, अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली. यावेळी निकम यांनी जवळपास पंधरा खटल्यांची कागदपत्रे न्यायालयाला सादर केली.
निकम यांचा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना शिक्षेबाबत काही सांगायचे काय, अशी विचारणा केली व त्यानंतर शनिवार, दि. २० रोजी निकाल देण्याचे जाहीर करून न्यायालयाचे कामकाज थांबविले.
परिस्थितीजन्य पुराव्यातील महत्त्वाचे मुद्दे
आपल्या युक्तिवादात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा का द्यावी याविषयी खटल्यातील परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे तेरा मुद्दे न्यायालयासमोर स्पष्ट केले. त्यात-
१) मयत सचिन धारू हा अनुसूचित जातीचा होता व तो त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात कामाला होता व त्याच महाविद्यालयातील सवर्ण जातीच्या विद्यार्थिनीशी त्याचे प्रेम होते व दोघांनीही लग्न करण्याचा निश्चय केला होता.
२) सदरची घटना १ जानेवारी २०१३ रोजी दुपारी साडेतीन ते रात्री आठ वाजेच्या दरम्यान घडली होती. सचिन धारू जेथे काम करीत होता व राहत होता तेथून २५ किलोमीटर अंतरावर दरंदल वस्तीत हे घटनास्थळ आहे.
३)घटनेच्या अगोदर पंधरा ते वीस दिवसांपूर्वी सचिनला आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिली होती.
४) मयत सचिन धारू हा सवर्ण जातीच्या मुलीशी विवाह करणार आहे याची पुरेपूर खात्री आरोपींना होती हे हेरूनच त्यांनी कट केला व अशोक नवगिरे याला त्यासाठी पुढे करून सचिनचा मित्र संदीप धनवार याला खोटे कारण दाखवून बोलवून घ्यायचे, संदीपबरोबर सचिन धारू हादेखील येईल हे सर्व आरोपींना ज्ञात होते.
५) अशोक नवघरेच्या निमंत्रणावरून संदीप व सचिन हे दुचाकीने सकाळी १० वाजता त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलातून दरंदले वस्तीकडे गेले होते.
६) १ जानेवारी २०१३ रोजी सकाळी दहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत संदीप व सचिन हे दरंदले वस्तीवर काम करीत होते.
७) रात्री १ वाजता आरोपी पोपट दरंदले व अशोक नवघरे यांनी सोनई पोलीस स्टेशनला तोंडी तक्रार दिली त्यात म्हटले की, संडासाच्या सफाईचे काम सुरू असताना सफाई कामगाराचे प्रेत सापडले आहे, अशी खोटी माहिती देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
८) सर्व आरोपींनी योग्य नियोजन करून थंड डोक्याने क्रूरपणे तिहेरी हत्याकांड केले आहे.
९) या खटल्यात सवर्ण जातीची मुलगी फितूर झाली असली तरी, ही घटना १ जानेवारी २०१३ रोजी घडली तोपर्यंत मुलगी त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात कॉलेजमध्ये शिकत होती. परंतु घटनेनंतर तिने कॉलेजला जाणे बंद केले. याबाबत तिला तिच्या शिक्षकांनी विचारले असता, ‘तिने आमच्या घरी प्रॉब्लेम झाला आहे’ असे सांगितले.
१०) सर्व आरोपींचा सचिनवर इतका राग व द्वेष होता की त्यांनी जात व्यवस्थेला महत्त्व दिले ही शोकांतिका आहे.
११) हत्याकांड करताना आरोपींचा राग इतका टोकाला होता की त्यांनी सचिनच्या हात व पायाचे ८ तुकडे केले व ते पाणी असलेल्या खोल विहिरीत टाकले तसेच त्याचे शीर कापून धड कोरड्या विहिरीत बुजून टाकले. सचिनचा मित्र राहुल याचाही निर्घृणपणे खून करताना त्याच्या डोक्यावर घाव घातले.
१२) आरोपींनी अतिशय नियोजनपर्ण कट केला. सचिन व राहुल यांचा कोणताही पुरावा ठेवला नाही.
१३) सचिनचा मित्र संदीप याला संडासात उलटे टांगून त्याला गुदमरून ठार मारले.
पुनर्जन्मावर विश्वास बसला - निकम
आरोपींची क्रूरता व हिंसा पाहून आपल्याला रामायणातील राक्षसांची आठवण आल्याचे अ‍ॅड. निकम यांनी न्यायालयाला सांगितले. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यू येतोच, परंतु आरोपींची क्रूरता पाहून राक्षसरूपी सैतान पुन्हा भूतलावर जन्म घेऊ शकतात यावर आपला पुनर्जन्मावर विश्वास बसल्याचे निकम म्हणाले. अतिशय गोठलेल्या रक्ताने केलेले हे हत्याकांड असून, आपल्या संस्कृतीत शवाचा मान ठेवला जातो, परंतु या घटनेत ज्या पद्धतीने मृतदेहाचे तुकडे करण्यात आले ते पाहता, शवाचा मानही आरोपींनी ठेवला नाही. हादेखील एक प्रकारे गुन्हाच असल्याचेही ते म्हणाले.
निकम यांनी खोडून टाकले बचाव पक्षाचे मुद्दे
खटल्यातील दोषी आरोपींना न्यायालयाने कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी विनंती आरोपींच्या वतीने त्यांच्या वकिलांनी केली. आपल्या युक्तिवादात अ‍ॅड. निकम यांनी त्यांचे सर्व मुद्दे खोडून टाकले. निकम म्हणाले, आरोपींमध्ये तरुण व वृद्ध आहेत त्यांना दया दाखवा, असे म्हटले गेले. परंतु या खटल्यातील सर्व तथ्य बघितले तर एक मात्र निश्चित आहे की, आरोपींनी अतिशय कौशल्यपूर्ण विचारपूर्वक हत्याकांड केले व पोलिसांना चुकीची माहिती दिली. आरोपी हे ६० वर्षांचे आहेत असे म्हटले गेले. ६० वर्षे हे काय वृद्धापकाळाचे नाही. आपल्याकडे आता जीवनमान ७० ते ७५ पर्यंत उंचावले आहे, त्यामुळे ज्या पद्धतीने खून केले गेले ते पाहता वय पाहून शिक्षा कमी करू नये, असे

 

Web Title: Demand for the death penalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा