कॅरमबोर्डची मागितली लाच :  बालनिरीक्षणगृहाच्या अधीक्षकासह लिपिकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 01:12 AM2018-08-22T01:12:49+5:302018-08-22T01:13:21+5:30

उंटवाडीतील बालनिरीक्षणगृहात दाखल मुलाचा बाल न्यायमंडळ कोर्टातून जामीन करून घेण्यासाठी आवश्यक असलेले पीओ लेटर तसेच जामीन मिळाल्यानंतर सहकार्य करून मुलास सोडण्यासाठी कॅरमबोर्डची लाच मागणाऱ्या बालनिरीक्षणगृहाच्या अधीक्षक नलिनी पाटील व लिपिक प्रशांत देसले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि़२१) रंगेहाथ पकडले़

 Demand for Car Bombboard Bribe: Duplicate arrest along with the Superintendent of Education | कॅरमबोर्डची मागितली लाच :  बालनिरीक्षणगृहाच्या अधीक्षकासह लिपिकास अटक

कॅरमबोर्डची मागितली लाच :  बालनिरीक्षणगृहाच्या अधीक्षकासह लिपिकास अटक

Next

नाशिक : उंटवाडीतील बालनिरीक्षणगृहात दाखल मुलाचा बाल न्यायमंडळ कोर्टातून जामीन करून घेण्यासाठी आवश्यक असलेले पीओ लेटर तसेच जामीन मिळाल्यानंतर सहकार्य करून मुलास सोडण्यासाठी कॅरमबोर्डची लाच मागणाऱ्या बालनिरीक्षणगृहाच्या अधीक्षक नलिनी पाटील व लिपिक प्रशांत देसले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि़२१) रंगेहाथ पकडले़  उपअधीक्षक विश्वजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराचा मुलास बाल न्यायमंडळाच्या आदेशाने उंटवाडीतील बालनिरीक्षणगृहात दाखल करण्यात आले होते़ या मुलाचा बाल न्यायमंडळ कोर्टातून जामीन करून घेण्यासाठी बालसुधारगृह अधीक्षक यांच्याकडून पीओ लेटर देण्याकरिता व जामीन मिळाल्यानंतर सहकार्य करून मुलास सोडण्यासाठी अधीक्षक पाटील व लिपिक देसले यांनी कॅरमबोर्डची मागणी केली होती़ याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती़
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीवरून मंगळवारी (दि़२१) सापळा रचून पडताळणी केली असता अधीक्षक पाटील व लिपिक देसले यांनी तक्रारदाराकडे लाचेच्या स्वरूपात कॅरमबोर्डची मागणी केली़ तसेच निरीक्षणगृहात तक्रारदाराकडून कॅरमबोर्ड स्वीकारला असता त्यांना अटक करण्यात आली़

Web Title:  Demand for Car Bombboard Bribe: Duplicate arrest along with the Superintendent of Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.