देशमानेत आणखी एका टॅँकरची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 04:03 PM2019-06-04T16:03:08+5:302019-06-04T16:03:25+5:30

तिव्र पाणीटंचाई : अन्यथा आंदोलनाचा इशारा

Demand for another tanker in Deshman | देशमानेत आणखी एका टॅँकरची मागणी

देशमानेत आणखी एका टॅँकरची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्दे दोन टँकर देण्यास टाळाटाळ होत असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईस तोंड द्यावे लागत आहे.

देशमाने : देशमाने बुदु्रक आणि देशमाने खुर्द शिवारातील वाडीवस्त्यावर केवळ एकाच टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा अत्यल्प असल्याने दोन टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा, अशी मागणी करूनही दुसरा टँकर सुरू न झाल्याने निम्म्याहून अधिक वाडीवस्त्यावर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दोन टँकर त्वरित सुरू करावे अन्यथा नागरिकांसह तीव्र आंदोलनाचा इशारा सरपंच सौ.विमलबाई शिंदे यांनी दिला आहे.
देशमाने बु.व खु.हे दोन स्वतंत्र गावे असून एकूण नऊ वाडीवस्त्या आहेत. दोन्ही गावचा शिवार विस्तार हा तब्बल ३२ कि.मी. एवढा असून सुमारे पाच हजार लोकसंख्या आहे. संपूर्ण वाडीवस्त्यावर भीषण पाणीटंचाई आहे. पाणीपुरवठा केवळ एकाच टँकरने होतो तोही अनियमित. प्रशासनास ही बाब माहीत असतानाही अनेकदा लेखी व तोंडी मागणी करूनही दोन टँकर देण्यास टाळाटाळ होत असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईस तोंड द्यावे लागत आहे. परिणामी संतप्त नागरिक व ग्रामपालिका प्रशासनात दररोज वादंग होत आहे. दरम्यान, आगामी दोन दिवसात दुसरा टँकर सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिक व सरपंच सौ. विमलबाई शिंदे यांनी दिला आहे.

Web Title: Demand for another tanker in Deshman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.