Delay in bus service due to lack of managers | व्यवस्थापकांच्या दुर्लक्षामुळे बससेवेला विलंब
व्यवस्थापकांच्या दुर्लक्षामुळे बससेवेला विलंब

ठळक मुद्दे लासलगाव आगाराच्या बसेस विलंबाने धावत आहे.

लासलगाव : येथील बसस्थानकात आगार व्यवस्थापकांच्या दुर्लक्षामुळे बसेस विलंबाने धावत आहे. अनेक बसेस ऐनवेळी रद्द केल्या जात आहे. तसेच किमान अर्धा ते एक तास विलंबाने बसेस धावत असल्याने प्रवासी वर्ग हैराण झाला आहे. लासलगाव आगार व्यवस्थापक शेळके यांच्या बदलीनंतर आगारप्रमुख पद्मने यांच्या दुर्लक्षामुळे लासलगाव आगाराच्या बसेस विलंबाने धावत आहे. त्यामुळे प्रवाशांनाही उशीर होत आहे. लासलगाव येथे निफाड, चांदवड, येवला तसेच कोपरगाव या चार तालुक्यात येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी बसेने प्रवास करतात.


Web Title: Delay in bus service due to lack of managers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.