अज्ञात वाहनाच्या धडकेने हरीण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 06:33 PM2019-03-07T18:33:38+5:302019-03-07T18:34:47+5:30

चांदवड तालुक्यातील वडाळीभोई शिवारात आग्रारोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेने हरीण ठार झाले.

Deer killed by an unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेने हरीण ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेने हरीण ठार

Next

चांदवड : तालुक्यातील वडाळीभोई शिवारात आग्रारोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेने हरीण ठार झाले. वडाळीभोई येथील यश पेट्रोलपंपाच्या बाजूस रस्त्याने जाणाऱ्या भरधाव वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या हरिणास धडक दिली. या धडकेने हरीण गंभीर जखमी झाले व अतिरक्तस्रावाने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेबाबत वडाळीभोई पोलीस ठाणे व वनरक्षक दलास माहिती देण्यात आली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मृत हरिणास ताब्यात घेतले.

Web Title: Deer killed by an unknown vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.