गॅलरीतून पडल्याने युवतीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:23 AM2019-06-08T00:23:27+5:302019-06-08T00:24:20+5:30

दिंडोरीरोड परिसरातील तलाठी कॉलनीतील एका इमारतीच्या गॅलरीतून पडून एका १९ वर्षांच्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.४) सकाळी उघडकीस आली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

The death of the woman due to falling from the gallery | गॅलरीतून पडल्याने युवतीचा मृत्यू

गॅलरीतून पडल्याने युवतीचा मृत्यू

Next

पंचवटी : दिंडोरीरोड परिसरातील तलाठी कॉलनीतील एका इमारतीच्या गॅलरीतून पडून एका १९ वर्षांच्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.४) सकाळी उघडकीस आली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साक्षी सतीशराव अहिरराव असे मयत झालेल्या युवतीचे नाव आहे. ज्या ठिकाणी साक्षी जखमी अवस्थेत आढळून आली त्या ठिकाणची परिस्थिती, तिच्या अंगावरील जखमा यावरून साक्षीने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मंगळवारी तलाठी कॉलनी परिसरातील चैत्रचेतन अपार्टमेंटमध्ये राहणारी साक्षी इमारतीच्या आवारात कोसळली असल्याचे पहाटे दूधवाटप करणाऱ्या इसमाला आढळून आले. त्याने इमारतीतील रहिवाशांना ही बाब सांगितली. तोपावेतो साक्षीचे वडील तिचा शोध घेत खाली आले व तिला जखमी बघून उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले, परंतु प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना सकाळी तिची प्राणज्योत मालवली.
साक्षीने दुसºया मजल्यावरील पत्र्याच्या शेडवर जाऊन उडी का मारली? याशिवाय इमारतीत सीसीटीव्ही बसविलेले असून फुटेज तपासणीत साक्षी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास खाली पडताना दिसते. ती पहाटेपर्यंत तेथेच विव्हळत पडलेली फुटेजमध्ये दिसते तर तिचा मोबाइल जमिनीवर पडल्याने तिचे कोणाशी बोलणे सुरू होते का याचा तपास पोलीस करत आहेत. एकूणच साक्षीच्या मृत्यूप्रकरणी सध्या पोलिसांनी अकस्मात नोंद केली असली तरी विविध प्रश्न उपस्थित झाला.
ज्याठिकाणी साक्षी जखमी अवस्थेत पडली होती त्याठिकाणी पोलिसांनी पाहणी केली असता सदर मुलीचा मृत्यू कशाने झाला याबाबत पोलीस संभ्रमात पडले आहेत.

Web Title: The death of the woman due to falling from the gallery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.