मृत्यूचा सापळा : मातोरी-गिरणारे राज्य महामार्गावर एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 07:00 PM2018-04-24T19:00:48+5:302018-04-24T19:00:48+5:30

या भागात मद्यप्राशनासाठी येणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाण वाढल्याने रस्त्यावर सातत्याने लहान-मोठे अपघात घडत आहेत. दरम्यान, चांदशी फाट्यावर झालेल्या अपघातात एका युवकाला प्राण गमवावे लागले

Death trap: A killer on a highway state highway | मृत्यूचा सापळा : मातोरी-गिरणारे राज्य महामार्गावर एक ठार

मृत्यूचा सापळा : मातोरी-गिरणारे राज्य महामार्गावर एक ठार

Next
ठळक मुद्देचांदशी फाट्यावर झालेल्या अपघातात एका युवकाला प्राण गमवावे लागलेपत्नीही गंभीर, त्यांच्यावरही उपचार सुरू

नाशिक : मातोरी-गिरणारे राज्य महामार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या विविध हॉटेलमध्ये सर्रासपणे मद्यविक्री होत असल्याने मद्यप्राशन करून वाहतुकीचे प्रमाण वाढल्याने रस्ता मृत्यूचा सापळा ठरत आहे. दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडके त एका युवकाचा मृत्यू झाला आहे. एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मातोरी ते गिरणारे या रस्त्याला महामार्ग घोषित करण्यात आले आहे. त्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक व रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिकांकडून मोठ्या संख्येने हॉटेल व्यवसाय सुरू करण्यात आले. या भागात मद्यप्राशनासाठी येणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाण वाढल्याने रस्त्यावर सातत्याने लहान-मोठे अपघात घडत आहेत. दरम्यान, चांदशी फाट्यावर झालेल्या अपघातात एका युवकाला प्राण गमवावे लागले, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. सचिन कोरडे (वय ३२, रा. मुंगसरा) हे दुचाकीने (एमएच १५ एफसी ६०२८) पत्नी व मुलींसोबत घरी परतत असताना समोरून भरधाव वेगाने येणा-या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी कोरडे यांच्या दुचाकीवर जाऊन आदळली. या अपघातात कोरडे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांना बेशुद्ध अवस्थेत नागरिकांनी तत्काळ रुग्णालयात हलविले; मात्र कोरडे यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीलाही गंभीर मार लागला असून, त्यांच्यावरही उपचार सुरू आहे. दुसरा दुचाकीस्वार निवृत्ती अरिंगळे हादेखील गंभीर जखमी झाला आहे. सदर घटनेची माहिती मातोरी गावाचे पोलीसपाटील रमेश निवृत्ती पिंगळे यांनी तालुका पोलीस ठाण्याला कळविली.

Web Title: Death trap: A killer on a highway state highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.