Death of a person drifting | पोहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू
पोहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू

नाशिक : शहरातील सावरकर जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा श्वास घेण्यात त्रास उद्भवल्याने मृत्यू झालाचा प्रकार घडला असून हेमंत वसंत तरटे (५९) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
द्वारका परिसरातील जनलर वैद्यनगर येथील पाटीदार भवन समोरच्या किशन कन्हैया अपार्टमेंटमधील हेमंत तरटे गुरुवारी (दि. १४) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नाशिक महानगर पालिकेच्या तरण तलावात नेहमीप्रमाणे पोहण्यासाठी गेले होते. नियमितपणे पोहून झाल्यानंतर ते कपडे परिधान करीत असताना अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास उद्भवल्याने तरण तलावाचे व्यवस्थापक हरी सोनकांबळे यांनी औषधोपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.


Web Title:  Death of a person drifting
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.