विषारी औषध टाकून कोबी पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 01:25 AM2019-07-23T01:25:14+5:302019-07-23T01:25:38+5:30

पाळे खुर्द : कळवण तालुक्यात गोसराणे येथे अज्ञात समाजकंटकांनी ललिता सिकंदर मोरे यांच्या शेतातील एक एकर क्षेत्रावरील काढणीस आलेल्या ...

 Damage to the cabbage crop by poisoning the drug | विषारी औषध टाकून कोबी पिकाचे नुकसान

विषारी औषध टाकून कोबी पिकाचे नुकसान

googlenewsNext

पाळे खुर्द : कळवण तालुक्यात गोसराणे येथे अज्ञात समाजकंटकांनी ललिता सिकंदर मोरे यांच्या शेतातील एक एकर क्षेत्रावरील काढणीस आलेल्या कोबी पिकावर विषारी औषध फवारणी करून पिकाचे नुकसान केले.
सहा महिन्यांपूर्वीच ललिता यांच्या पतीचे अकाली निधन झाले. पतीच्या पश्चात कुटुंबाची उदरनिर्वाहाची जबाबदारी त्यांच्यावर आली. परिस्थितीशी संघर्ष करत अस्मानी व सुलतानी संकटांवर जिद्दीने मात करत आपल्या शेतात गट नं. ११६ व ११९ मध्ये त्यांनी कोबी पिकाची लागवड केली होती. रात्रंदिवस पाणी भरून चांगली मशागत करून एक एकरवर कोबीचे पीक घेतले. या पिकासाठी बियाणे, निंदणी, फवारणीसाठी सुमारे ५० हजार हजारांवर खर्च करण्यात आला  होता.  सद्य:स्थितीला बाजारात कोबीला बऱ्यापैकी भाव असल्याने कोबी पिकातून अंदाजे दोन लाख रु पयांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र रविवारी अज्ञात समाजकंटकांनी पिकावर विषारी औषध फवारणी करून मोरे यांचे लाखोचे नुकसान केले.
मध्यंतरी याच शेतकरी महिलेच्या कोथिंबीर पिकाचेही नुकसान करण्यात आले होते. याप्रकरणी ललिता मोरे यांनी अभोणा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्र ारी अर्जानुसार अज्ञात व्यक्तीविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तसाप सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनखाली सुरू आहे.
 

Web Title:  Damage to the cabbage crop by poisoning the drug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.