नाशिक जिल्ह्यात बोंडअळीने ६० टक्के कापुस पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 06:35 PM2018-01-01T18:35:50+5:302018-01-01T18:38:27+5:30

दिड महिन्यापुर्वी बीटीकॉटन वर फवारणी करण्यासाठी वापरल्या जाणाºया काही कंपन्यांच्या सदोष औषधामुळे बोंडअळीचा झपाट्याने प्रादुर्भाव झाला आहे.

Damage to 60% cotton crop in Bondalai in Nashik district | नाशिक जिल्ह्यात बोंडअळीने ६० टक्के कापुस पिकाचे नुकसान

नाशिक जिल्ह्यात बोंडअळीने ६० टक्के कापुस पिकाचे नुकसान

Next
ठळक मुद्देमालेगाव, येवला, नांदगावला फटका : २५ हजार हेक्टर बाधित२५३५६ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान

नाशिक : विदर्भापाठोपाठ नाशिक जिल्ह्यातही कापुस पिकावर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने त्यामुळे कापसाच्या उत्पादनावर सुमारे ६० टक्के परिणाम झाल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. कृषी खात्याने केलेल्या पीक पंचनाम्याच्या अहवालानुसार जिल्ह्यातील सुमारे २५ हजाराहून अधिक हेक्टर वरील पिक बोंडअळीने नष्ट केले असून, त्याचा फटका मालेगाव, येवला व नांदगाव तालुक्यातील शेतक-यांना सर्वाधिक बसला आहे.
दिड महिन्यापुर्वी बीटीकॉटन वर फवारणी करण्यासाठी वापरल्या जाणाºया काही कंपन्यांच्या सदोष औषधामुळे बोंडअळीचा झपाट्याने प्रादुर्भाव झाला आहे. प्रारंभी विदर्भापुरताच हा प्रश्न मर्यादित असल्याचे मानले जात होते, तथापि, डिसेंबरमध्ये जिल्ह्यात काढणीला आलेल्या कापसावरही त्याचा परिणाम दिसू लागल्याने अनेक शेतक-यांनी बोंडअळीचा अन्यत्र प्रादुर्भाव रोखण्यासाठी कापसाचे पीकच उखडून नष्ट केले तर काहींना त्यावरही औषध फवारणी करून नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला. या सर्व गोष्टीचा विचार करता शासनाने अखेर बोंडअळीने नुकसान झालेल्या पीकांचे पंचनामे करण्याचे आदेश गेल्या महिन्यात दिले. नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने मालेगाव, येवला, नांदगाव, देवळा, सटाणा, निफाड, चांदवड व सिन्नर या तालुक्यात कमी अधिक प्रमाणात कपाशीची लागवड केली जाते. साधारणत: ४६३२० हेक्टर क्षेत्र कपाशीचे असून, त्यातील बोंडअळीमुळे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान २५३५६ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे झाले आहे म्हणजेच लागवड केलेल्या क्षेत्रापैकी ६० टक्के पीक शेतकºयांच्या हातातून गेले असल्याने यंदा कपाशीचे उत्पन्न कमालिचे घटणार आहे. कृषी खात्याने प्राथमिक पातळीवर सदरचे पंचनामे केले असून, अंतीम नुकसान निश्चिती करण्यास अवधी असला तरी, सर्वाधिक फटका मालेगाव, येवला व नांदगाव तालुक्याला बसला आहे.

Web Title: Damage to 60% cotton crop in Bondalai in Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.