धरण ३८ टक्के भरले : ‘गंगापूर’च्या पाणलोट क्षेत्रात पहाटेपर्यंत ४०५ मि.मी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 04:49 PM2019-07-09T16:49:52+5:302019-07-09T17:01:20+5:30

गंगापूर धरणाच्याक्षेत्रात सोमवारपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी मंगळवारी मध्यरात्रीपासून पुन्हा गंगाूपर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणाचा जलसाठा २ हजार ११५ दलघफूपर्यंत पोहचला आहे.

Dam 38 percent filled: 405 mm rain in Gangetic catchment area till dawn | धरण ३८ टक्के भरले : ‘गंगापूर’च्या पाणलोट क्षेत्रात पहाटेपर्यंत ४०५ मि.मी पाऊस

धरण ३८ टक्के भरले : ‘गंगापूर’च्या पाणलोट क्षेत्रात पहाटेपर्यंत ४०५ मि.मी पाऊस

Next
ठळक मुद्देगंगापूर धरणाचा जलसाठा ३७.५६ टक्क्यांवर पोहचलापहाटेपर्यंत गंगापूरच्या क्षेत्रात ६० मि.मी.पर्यंत पाऊस

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा जलसाठा ३७.५६ टक्क्यांवर पोहचला असल्याने नाशिककरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. धरणाची पातळी आठवडाभरापुर्वी दहा टक्क्यांपर्यंत घसरली होती. त्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. सोमवारी पावसाचा जोर ओसरला होता; मात्र मंगळवारी (दि.९)मध्यरात्रीपासून पावसाचा जोर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगलाच वाढला. पहाटेपर्यंत गंगापूरच्या क्षेत्रात ६० तर धरणाच्या एकूण पाणलोटक्षेत्रात ४०५ मि.मीपर्यंत पाऊस पडल्याची नोंद झाली.
मागील शनिवारी रात्रीपासून पावसाला सुरूवात झाली होती. रविवारी दिवसभरात जोरदार पाऊस झाला. आठ तासांत शहरात ६२ मि.मी.पर्यंत पाऊस पडला. तसेच गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातदेखील मुसळधार पाऊस पडल्याने धरणात मोठ्या प्रमाणात नव्या स्वरूपात पाण्याची आवक झाली. गंगापूर धरणाच्याक्षेत्रात सोमवारपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी मंगळवारी मध्यरात्रीपासून पुन्हा गंगाूपर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणाचा जलसाठा २ हजार ११५ दलघफूपर्यंत पोहचला आहे. धरणामध्ये अद्याप १ हजार ११८ दलघफू इतके नवीन पाणी आल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.
मंगळवारी पाणलोट क्षेत्रातील गौतमीच्या परिसरात ४६, काश्यपी भागात ७२, त्र्यंबकमध्ये १२२ तर अंबोलीत १०९ मि.मी. इतका पाऊस पडल्याची नोंद झाली. गौतमी धरण २४.४३ टक्के , कश्यपी धरण २७.६४ टक्के भरले आहे.
 

Web Title: Dam 38 percent filled: 405 mm rain in Gangetic catchment area till dawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.