दादांची भाईगिरी मोडीत काढणार :  विश्वास नांगरे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:34 AM2019-03-21T00:34:06+5:302019-03-21T00:34:30+5:30

अंबड औद्योगिक वसाहतीत कामगारांची लूटमार, कारखान्यांमधून होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी तसेच कामगारांच्या युनियन व संघटनांमुळे होणाºया वादावर उपाय शोधण्यासाठी व उद्योजकांना येणाºया अडचणी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे.

Dada's brother-in-law will overcome: trust Nangre Patil | दादांची भाईगिरी मोडीत काढणार :  विश्वास नांगरे पाटील

दादांची भाईगिरी मोडीत काढणार :  विश्वास नांगरे पाटील

googlenewsNext

सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीत कामगारांची लूटमार, कारखान्यांमधून होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी तसेच कामगारांच्या युनियन व संघटनांमुळे होणा-या वादावर उपाय शोधण्यासाठी व उद्योजकांना येणाºया अडचणी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. दादांची भाईगिरी मोडीत काढण्यासाठी त्यांची कुंडली गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.
अंबड इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर असोसिएशन (आयमा) च्या वतीने आयोजित बैठकीप्रसंगी उद्योजकांना मार्गदर्शन करताना नांगरे-पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आयमा अध्यक्ष वरुण तलवार, माजी अध्यक्ष धनंजय बेळे, सरचिटणीस निखिल पांचाळ, खजिनदार उन्मेश कुलकर्णी, सेक्रेटरी ललित बूब, महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, विनायक मोरे, पोलीस उपायुक्त अमोल तांबे आदी उपस्थित होते. यावेळी उद्योजकांनी औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्या मांडल्या असून, यात प्रामुख्याने बंद कारखान्यांमधून होणाºया चोºया, कामगारांची लूट, युनियनमधील अंतर्गत वाद, महिला कामगारांची सोनसाखळी चोरी तसेच ट्रॅफिक समस्यांबाबतही उद्योजकांनी समस्या मांडल्या. शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी असल्याने काही भागात पोलीस पोहचू शकत नसले तरी आपणही साध्या वेशातील पोलीस आहोत ही भावना ठेवून पोलिसांना सहकार्य केल्यास यातूनही अनेक प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, असे नांगरे-पाटील यांनी सांगितले.सूत्रसंचालन गौरी कुलकर्णी यांनी तर आभार निखिल पांचाळ
यांनी मानले.
आयमाचे माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे समस्या मांडताना म्हणाले, औद्योगिक वसाहतीतील मोकळ्या जागांवर अनधिकृतपणे चहा-पाणी व नाष्ट्यांच्या गाड्या लावण्यात आल्या आहेत. या ठिकाणी कारखाना सुटल्यानंतर कामगार जमा होतात. यानंतर या गाड्यांवर अवैध व्यवसाय सुरू होत असून, असे प्रकार सर्रासपणे औद्योगिक वसाहतीच्या परिसरात घडत आहेत. यामुळेच गुन्हेगारीदेखील वाढली असून, याबाबत पोलिसांनी कारवाई करण्याची अपेक्षा अहिरे यांनी व्यक्त केली. यावर पोलीस आयुक्तांनी या घटनेची तत्काळ दखल घेत अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.

Web Title: Dada's brother-in-law will overcome: trust Nangre Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.