नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर ‘सायकल ट्रॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 10:57 PM2017-11-22T22:57:43+5:302017-11-23T00:40:18+5:30

पर्यावरणाचा विचार करता सायकलप्रेमींसाठी नाशिक ते त्र्यंबकेश्वर या २९ किलोमीटर अंतरातील रस्त्याच्या दुतर्फा सायकल मार्ग करण्याचा निर्णय जिल्हाधिकाºयांनी घेतला असून, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून निधीची उपलब्धता करण्यात येणार आहे.

 'Cycle track' on Nashik-Trimbakeshwar road | नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर ‘सायकल ट्रॅक’

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर ‘सायकल ट्रॅक’

googlenewsNext
ठळक मुद्दे२९ किलोमीटर अंतरातील रस्त्याच्या दुतर्फा सायकल मार्ग नावीन्यपूर्ण योजनेतून निधीची उपलब्धता सायकलप्रेमींसाठी हा सायकल मार्ग चांगला

नाशिक : पर्यावरणाचा विचार करता सायकलप्रेमींसाठी नाशिक ते त्र्यंबकेश्वर या २९ किलोमीटर अंतरातील रस्त्याच्या दुतर्फा सायकल मार्ग करण्याचा निर्णय जिल्हाधिकाºयांनी घेतला असून, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून निधीची उपलब्धता करण्यात येणार आहे.  नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याचे चौपदरीकरण करतानाच सार्वजनिक बांधकाम खात्याने या मार्गावर एका बाजूला सायकल मार्ग व दुसºया बाजूला त्र्यंबकेश्वर यात्रेसाठी पायी जाणाºया भाविकांसाठी पायी मार्गासाठी जागा सोडलेली आहे. या प्रशस्त मार्गावरील एकूणच नैसर्गिक वातावरण व पर्यावरणाचा विचार करून दररोज शेकडो सायकलस्वार सकाळी फेरफटका मारण्यासाठी जात असतात. जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनीदेखील याच मार्गावरून प्रवास केलेला असल्याने या रस्त्याच्या बांधणीचा विचार करता, नाशिककर सायकलप्रेमींसाठी हा सायकल मार्ग चांगला होऊ शकतो हे पाहून त्यांनी या रस्त्यावर सायकलीसाठी स्वतंत्र मार्ग असावा म्हणून दुभाजक टाकण्याचाही निर्णय घेतला आहे. मुंबईला महानगर विकास प्राधिकरणाने साधारणत: तीन इंच उंचीचे प्लॅस्टिकचे दुभाजक टाकण्यात आलेले आहेत, त्याच धर्तीवर संपूर्ण रस्त्यावर दोन्ही बाजूने दुभाजक टाकण्यात येणार असून, एकाच वेळी या मार्गावरून दोन सायकलस्वार ये-जा करू शकतील असे त्यासाठी नियोजन आहे. त्यासाठी येणाºया खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश  जिल्हाधिकाºयांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंत्याना दिले आहेत. त्यासाठी येणाºया खर्चासाठी निधीची तरतूद नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून करण्यात येणार आहे.
यात्रोत्सव काळात सायकल मार्गावर बंधने
 नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भाविकांना पायी जाण्यासाठी स्वतंत्र जागा सोडण्यात आली आहे. भाविक त्याचा वापरही मोठ्या प्रमाणावर करतात. साधारणत: जानेवारी महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे श्री संत निवृत्तिनाथ यात्रा भरते. या काळात विशिष्ट कालावधीसाठी पायी मार्गावरून सायकलीचा वापर करता येणार नाही. अन्य वेळी मात्र रस्त्याच्या दुतर्फा सायकल मार्गाचा सर्वांना वापर करता येणार आहे.

Web Title:  'Cycle track' on Nashik-Trimbakeshwar road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.