क्रिसीलचा प्रारूप अहवाल सादर : तूट भरून काढण्यासाठी विकासशुल्क, मुद्रांकशुल्क, इंधनसेस वाढीची शिफारस बससेवा कशीही चालवा, बोजा नाशिककरांवरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:10 AM2018-01-20T01:10:48+5:302018-01-20T01:11:17+5:30

नाशिक : शहर बससेवा महापालिकेने ताब्यात घ्यावी किंवा नाही, याबाबतचा प्रारूप शक्यता अहवाल क्रिसील या संस्थेने महापालिका आयुक्तांना सादर केला.

Crisil's draft report submitted: Recommendation of increase in tariff, stamp duty, fuels, to carry out the deficit: Anyway, bus services should be run on the Nashik! | क्रिसीलचा प्रारूप अहवाल सादर : तूट भरून काढण्यासाठी विकासशुल्क, मुद्रांकशुल्क, इंधनसेस वाढीची शिफारस बससेवा कशीही चालवा, बोजा नाशिककरांवरच!

क्रिसीलचा प्रारूप अहवाल सादर : तूट भरून काढण्यासाठी विकासशुल्क, मुद्रांकशुल्क, इंधनसेस वाढीची शिफारस बससेवा कशीही चालवा, बोजा नाशिककरांवरच!

Next
ठळक मुद्देबससेवेबाबतचा अंतिम अहवालमार्गावरील बसफेºयाही कमी

नाशिक : शहर बससेवा महापालिकेने ताब्यात घ्यावी किंवा नाही, याबाबतचा प्रारूप शक्यता अहवाल क्रिसील या संस्थेने महापालिका आयुक्तांना सादर केला. अहवालानुसार, बससेवा कुणीही, कशीही चालविली तरी त्याचा काही प्रमाणात आर्थिक भार विविध कररूपाने नाशिककरांवरच पडणार आहे. बससेवा सुरू करताना तूट भरून काढण्यासाठी विकासशुल्क, मुद्रांकशुल्क, इंधनसेस यांसह मोटार व्हेइकल टॅक्समध्ये वाढ करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. दरम्यान, बससेवेबाबतचा अंतिम अहवाल येत्या ३१ जानेवारीपर्यंत सादर करण्याची सूचना आयुक्तांनी क्रिसीलला केली असून, त्यानंतर तो महासभेवर मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे. शहर बससेवा हस्तांतरित करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने नाशिक महापालिकेकडे लकडा लावला आहे. तूट कमी करण्यासाठी महामंडळाने गेल्या काही महिन्यांत काही मार्गावरील बसफेºयाही कमी केल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दौºयात महापालिकेने शहर बससेवा ताब्यात घ्यावी, त्यासाठी शासनाकडून सहकार्याची तयारी दर्शविली होती. महापालिकेने बससेवेबाबतचा शक्यता अहवाल तयार करण्यासाठी क्रिसील या संस्थेची नेमणूक केली होती. क्रिसीलला तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार, क्रिसीलने प्रारूप अहवाल आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याकडे सादर केला आहे. क्रिसीलने बससेवेबाबत तीन पर्याय सुचविले आहेत. त्यात, महापालिकेने परिवहन समिती स्थापन करून स्वत: चालवावी अथवा कंपनी स्थापन करावी अथवा पीपीपी तत्त्वावर सेवा चालवावी, या पर्यायांचा समावेश आहे. तीन पर्यायांपैकी कुठलाही पर्याय निवडला तरी, पहिल्या वर्षी २४ कोटी रुपये तूट भरून काढण्यासाठी महापालिकेवर आर्थिक भार येणारच आहे. त्यात, क्रिसीलने तूट भरून काढण्यासाठी विकासशुल्क, मुद्रांकशुल्क, मोटर व्हेइकल टॅक्स, इंधनावर सेस लावण्याची शिफारस केलेली आहे. बससेवा कशीही चालविली तरी डेपो आणि टर्मिनस यांचा खर्चही मनपाला आपल्या तिजोरीतून सोसावा लागणार आहे. मात्र, महामंडळाचे टर्मिनल भाडेतत्त्वावर घेता येऊ शकते, अशीही सूचना करण्यात आली आहे. बससेवा चालविण्यासाठी ११६ कोटी रुपये भांडवली खर्च अपेक्षित धरला असून, आॅपरेशन व मेंटेनन्ससाठी वार्षिक ७० कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. प्रामुख्याने तिकीट विक्रीपासून पहिल्या वर्षी ४६ कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. त्यामुळे २४ कोटींची तूट भरून काढण्यासाठी मनपा असो अथवा कंपनी यांना विविध करांच्या माध्यमातून पैसा उभा करावा लागणार आहे. त्यामुळे, बससेवा कशीही-कोणीही चालविली तरी, काही प्रमाणात महापालिकेवर आर्थिक भार अटळ आहे.

Web Title: Crisil's draft report submitted: Recommendation of increase in tariff, stamp duty, fuels, to carry out the deficit: Anyway, bus services should be run on the Nashik!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.