शस्त्राचा धाक दाखवून लुटणाºया दोघांविरुद्ध गुन्हा

मालेगाव : धारदार शस्त्राचा धाक दाखवून बळजबरीने भ्रमणध्वनी संच व रोकड लुटणाºया नयापुरा भागातील दोघांविरुद्ध आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. हकीमनगर ते इस्लाम जिमखाना रोड येथे बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मोहंमद अन्वर मोईद्दीन (४१) रा. हकीमनगर गट नं. १० यांनी पोलिसात फिर्याद दिली. फिर्यादी व त्याचा साथीदार यांना सय्यद वाहीद सय्यद खालीद उर्फ वाहीद झिंग्या आणि सय्यद रहीम सय्यद खालीक उर्फ हॅण्डसम दोन्ही रा. नयापुरा यांनी त्यांच्या हातातील धारदार शस्त्र व कुकरीचा धाक दाखवून फिर्यादीच्या पॅण्टच्या खिशातील सात हजार रूपये किंमतीचे दोन रेडमी कंपनीचे भ्रमणध्वनी संच, एक सॅमसंग कंपनीचा अडीच हजाराचा भ्रमणध्वनी संच व एक हजार रूपये फिर्यादीच्या साथीदाराच्या खिशातील पंधराशे रूपये किंमतीचा भ्रमणध्वनी संच व चारशे रूपये रोख व महेफुश रहेमान अ. माजीद यांचा भ्रमणध्वनी संच असा एकूण १५ हजार ४०० रूपयांचा ऐवज कुकरीचा धाक दाखवून लुटून नेला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक क्षीरसागर करीत आहेत.


Web Title: Crime against both arms and robbery
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.