शहरातील ११७ टवाळखोरांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 01:53 AM2019-03-09T01:53:17+5:302019-03-09T01:53:33+5:30

शहरातील नवीन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शहरातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी टवळाखोरांविरोधात मोहीम उघडली असून, पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी शहरातील विविध भागांतून तब्बल ११७ टवाळखोरांवर गुन्हे दाखल केले आहेत.

Crime against 117 Terrorists in the city | शहरातील ११७ टवाळखोरांवर गुन्हे

शहरातील ११७ टवाळखोरांवर गुन्हे

Next
ठळक मुद्देपोलिसांची कारवाई : शांतता भंग, जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना दणका

नाशिक : शहरातील नवीन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शहरातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी टवळाखोरांविरोधात मोहीम उघडली असून, पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी शहरातील विविध भागांतून तब्बल ११७ टवाळखोरांवर गुन्हे दाखल केले आहेत. हे टवाळखोर शहराच्या विविध भागांत एकत्र जमून जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करताना आढळून आल्याने त्यांचावर कारवाई करण्यत आली असून, पोलिसांच्या या कारवाईमुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावर बाइकराइडिंग व टवाळखोळी करणाऱ्यांना जरब बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे.
नाशिक शहर पोलिसांनी दि. ६ व ७ रोजी अंबड, आडगाव, भद्र्रकाली, इंदिरानगर, गंगापूर, सातपूर भागात सातपेक्षा जास्त गुन्हे दाखल करून सुमारे १२० संशयित टवाळखोरांवर कारवाई केली आहे. अंबड पोलीस ठाण्यातील हवालदार विजय शिंपी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिडकोतील स्टेट बँक चौकात १०ते १२ अज्ञात संशयित बुधवारी (दि.६) रात्री ८ वाजता बेकायदेशीररीत्या रात्री एकत्र जमून रस्ता अडविताना पोलिसांना आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. पंचवटी कॉलेजसमोरून गुरुवारी १८ ते १९ वर्षीय भगवान टोचे, पंकज शिंदे, ऋषिकेश साळवे, श्वेतांबर जोशी आणि अभिजित बोराडे आदी संशयितांनी एकत्र जमून पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करताना आढळून आले. यासह शालिमार येथील नेपाळी कॉर्नर येथे जितेश जीवन वाघेला, दीपक सुरेशचंद्र अग्रवाल, संदीप हाबूसिंग जाधव, इम्रान हारुण खान, सागर जीवन वाघेला व ताहेर इब्राहिम बेग आदी सर्व संशयित सार्वजनिक रस्त्यावर शांततेचा भंग करताना आढळून आले, त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. तर पाथर्डी फाटा येथील रायबा हॉटेलसमोरच्या रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास संतोष आत्माराम पवार, गणेश शंकर माळी, गजानन बाबूराव वाघमारे, हरी भगवान कोकाटे, संतोष गणेश कराळे व जनार्दन रायबा खंदारे हे संशयित सार्वजनिक शांततेचा भंग करताना आढळून आले असता त्यांना पोलिसांनी अटक
केली.
दरम्यान, अशाप्रकारे शहरातील विविध भागांतून सुमारे ११७ ते १२० टवाळखोरांवर शहर पोलिसांनी कारवाई करीत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. त्यामुळे अशाप्रकारे शहरातील विविध चौकांमध्ये जमून सर्वसामान्यांना त्रास देणाºया व छेडछाड करणाºया टवाळखोरांना जरब बसण्यास मदत होणार असल्याने नागरिकांकडून पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत होत आहे.
भद्रकाली-गंजमाळ परिसरात कारवाई
भद्रकालीतील खडकाळी सिग्नलजवळ असलेल्या राइस मिलजवळही पोलिसांनी गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कारवाई केली. यावेळी गोपी भीमा आचारी, मुजफ्फर शाकीर कुरेशी, वसिम रइस मोहंमद बंजारे, सलिम माजिद खान व अबिद अहमद हुसेन हे संशयित सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर शांततेचा भंग करताना पोलिसांना आढळून आल्याने त्यांना अटक करून जामिनावर सोडण्यात आले. गंजमाळ येथील कोमल कुशन्ससमोर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास वाजता मोझेस उत्तम लांडगे, विशाल राजू चिलवंते, दीपक कारभारी जोंधळे, सुधाकर गणपत जाधव, आनंद हरी जाधव, अमीर मोईनोद्दीन शेख व सनी नितीन वारे आदी शांततेचा भंग करताना पोलिसांना आढळून आल्याने त्यांना अटकेनंतर जामिनावर सोडण्यात आले. ४भद्रकालीतील तलावडी व व्हिडीओ गल्लीत येथे सायंकाळी सव्वापाच व रात्री सव्वादहा वाजता पोलिसांनी कारवाई केली. यात बाळासाहेब किसन पाईकराव, विशाल बाळासाहेब सदन, रवी सुकळा वाळे, जलिश जलील मोहंमद ठाकूर, नंदू गंगाधर क्षीरसागर, इरफान सलिम पठाण, जय त्र्यंबक लभडे, दीपक हरिभाऊ तोकडे, श्यामसिंग आत्माराम चव्हाण, कल्लू रामसुखी चव्हाण व नागराव शेषराव पिंगळे यांना पोलिसांनी टवाळखोरी करताना अटक केली. या सर्वांची पोलिसांनी कसून चौकशी करीत पुन्हा अशाप्रकारे शांततेचा भंग न करण्याची तंबी देत त्यांना जामिनावर सोडण्यात आले.

Web Title: Crime against 117 Terrorists in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.