The cost of the potholes is on the basis of government machinery | खड्ड्यांचा खर्च शासकीय यंत्रणांच्या माथी
खड्ड्यांचा खर्च शासकीय यंत्रणांच्या माथी

नाशिक : राज्य सरकारच्या १३ कोटी वृक्ष लागवडीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत नाशिक जिल्ह्णातील वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टात पुन्हा ५ लाखांची भर घालण्यात आली असली तरी, सुमारे ७७ लाख वृक्ष लागवडीसाठी उन्हाळ्यापूर्वी खड्डे खणण्यासाठी शासनाकडून मात्र एक रुपयाही अनुदान देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने खड्डे खणण्यासाठी आता अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वर्गणी गोळा करण्याची वेळ आली आहे.  जुलै महिन्यात राज्यात एकाच वेळी सर्वत्र वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्याचे नियोजन आत्तापासूनच सुरुवात करण्यात आले असून, सचिवांमार्फत वेळोवेळी त्याचा आढावाही घेण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्णासाठी शासनाने अगोदर ७२ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. त्यातील ७० लाख वृक्ष लागवड एकट्या वन विभागाकडून करण्यात येणार असून, जिल्हा परिषद, बांधकाम खाते, महसूल विभाग यांसारख्या विभागांच्या माध्यमातून दोन लाख लागवड करण्यात येणार आहे.लागवडीसाठी सामाजिक वनीकरण व वन खात्याकडून रोपे पुरविण्यात येणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडीसाठी लागणाºया जागेची अडचण सोडविण्यासाठी वन खात्याला जागा शोधण्यास सांगण्यात आले असून, नद्या, नाल्यांच्या पात्रात तसेच मोकळी मैदाने, शाळांचे कुंपण आदी जागांवर वृक्षलागवड करता येणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकाºयांनी बोलतानाही खड्डे खणण्यासाठी पैसे नसल्याचे सांगून सामाजिक उपक्रमातून खड्डे खणावेत, असा सल्ला यंत्रणांना दिला आहे. त्यामुळे त्या शासकीय कार्यालयांना शासनाच्या वृक्षलागवडीसाठी कराव्या लागणाºया खड्ड्यांचा खर्च करण्याची वेळ आली असून, अधिकारी, कर्मचाºयांनी स्वत:च्या खिशातून वर्गणी गोळा करण्यास सुरुवात केली आहे. काही कार्यालयांनी ठेकेदारांना यासाठी गळ घातली असून, काहींनी शासकीय कामासाठी कार्यालयात येणाºया नागरिकांनाच ‘सढळ हस्ते’ मदतीची याचना करण्याची विनंती केली आहे. शासनाच्या उपक्रम यशस्वीतेसाठी मात्र नागरिकांच्या खिशाला चट्टी बसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
उद्दिष्ट दिले मात्र पैसा मिळणार नाही
च्पावसाळ्यात वृक्षलागवडीचा प्रत्यक्ष कार्यक्रम असला तरी, यंत्रणांनी उन्हाळ्यातच खड्डे खणावेत, असे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. जिल्ह्णात वृक्षलागवडीची तयारी केली जात असताना शासनाने पुन्हा पाच लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट नव्याने वाढवून दिल्याने आता जिल्ह्णात ७७ लाख रोपांची लागवड केली जाईल. तथापि, ज्या ज्या यंत्रणांना उद्दिष्ट ठरवून देण्यात आले, त्या यंत्रणांना वृक्षलागवडीसाठी खड्डे खणण्यास पैसा मात्र दिला जाणार नाही.


Web Title: The cost of the potholes is on the basis of government machinery
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.