तीन महिने उलटूनही रस्ता होईना दुरूस्त; नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 05:43 PM2019-03-30T17:43:08+5:302019-03-30T17:45:38+5:30

गोपालवाडी, गरीब नवाज कॉलनी, सादिकनगर, महेबूबनगर, साठेनगर या सर्व भागांतील रहिवाशांच्या दैनंदिन वापराचा हा महत्त्वाचा रस्ता आहे.

Correcting the road after three months of reversal; Citizen stricken | तीन महिने उलटूनही रस्ता होईना दुरूस्त; नागरिक त्रस्त

तीन महिने उलटूनही रस्ता होईना दुरूस्त; नागरिक त्रस्त

Next
ठळक मुद्देहा रस्ता भुयारी गटार कामात पूर्णपणे नष्ट झाला आहे. पूर्व बांधकाम विभागाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केले

नाशिक : वडाळागावातील सिद्ध हनुमान मंदिर ते गोपालवाडी या रस्त्याची दुरवस्था होऊन तीन महिने उलटले आहे, तरीदेखील अद्याप रस्ता दुरुस्त करण्यास महापालिकेला मुहूर्त मिळालेला नाही. भूमिगत गटार कामासाठी रस्ता जेसीबीने उद्ध्वस्त केला गेला. गटारीचे काम पूर्णत्वास येऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
वडाळागावातील सिद्ध हनुमान मंदिर ते श्री. श्री. रविशंकर मार्गापर्यंत गोपालवाडीरोड आहे. भेंडीवाले बाबा दर्ग्यापासून थेट या रस्त्यावरून महापालिकेच्या भुयारी गटार विभागाकडून जेसीबीने खोदकाम करून भुयारी गटार टाकली गेली. या कामाला तब्बल दोन महिने उलटले आहेत, तरीदेखील अद्याप खोदकामाने उद््ध्वस्त झालेला रस्ता दुरुस्त केला जात नसल्याने या भागातील रहिवाशांनी नेमके कोणत्या मार्गाने जावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गोपालवाडी, गरीब नवाज कॉलनी, सादिकनगर, महेबूबनगर, साठेनगर या सर्व भागांतील रहिवाशांच्या दैनंदिन वापराचा हा महत्त्वाचा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करणे गरजेचे आहे. हा रस्ता भुयारी गटार कामात पूर्णपणे नष्ट झाला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे व मातीचे ढीग साचले असून, या रस्त्यावरून पायी जाणेदेखील अवघड आहे. त्यामुळे वाहने नेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मनपाच्या पूर्व बांधकाम विभागाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे, कारण हा रस्ता भुयारी गटार कामात उद्ध्वस्त झाला आहे.

Web Title: Correcting the road after three months of reversal; Citizen stricken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.