संजय राऊत यांच्या बैठकीस नगरसेवकांचा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 04:27 PM2018-04-25T16:27:00+5:302018-04-25T16:27:00+5:30

नाशिक- शिवसेनेत संघटनात्मक बदलानंतर उफाळून आलेली गटबाजी कायम असून नवनियुक्त पदाधिकारी सत्कार आणि विधान परिषदेच्या व्युहरचनेसंदर्भात बोलविण्यात आलेल्या पहिल्याच बैठकीस नगरसेवकांच्या एका गटाने ठेंगा दाखवला.

Corporators will get the meeting of Sanjay Raut | संजय राऊत यांच्या बैठकीस नगरसेवकांचा ठेंगा

संजय राऊत यांच्या बैठकीस नगरसेवकांचा ठेंगा

googlenewsNext
ठळक मुद्देमहापालिकेत निवडून आलेल्या ३५ नगरसेवकांपैकी अवघे पाच जण उपस्थित नगरसेवकांना बोलाविलेच नसल्याचा दावा

नाशिक- शिवसेनेत संघटनात्मक बदलानंतर उफाळून आलेली गटबाजी कायम असून नवनियुक्त पदाधिकारी सत्कार आणि विधान परिषदेच्या व्युहरचनेसंदर्भात बोलविण्यात आलेल्या पहिल्याच बैठकीस नगरसेवकांच्या एका गटाने ठेंगा दाखवला. उत्तर महाराष्टÑाचे संपर्क प्रमुख असलेल्या खासदार संजय राऊत यांनी सदरची बैठक बोलावली होती मात्र, त्यांनी पत्रकार परिषदेत सारवा सारव करताना बैठकीस नगरसेवकांना बोलाविलेच नसल्याचे सांगत शिवसेनेत सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला. दुसरीकडे पक्षातील काही जण हे माध्यमांना हाताशी धरून पक्षाच्या विरोधात बातम्या पेरत असल्याचा आरोप केल्याने गटबाजीला त्यांच्याकडूनच अप्रत्यक्षरीत्या पुष्टीही मिळाली.
खासदार राऊत यांच्या दौऱ्याचे निमंत्रण देतानाच शिवसेनेच्या वतीने शिवसेना कार्यालयात सकाळी साडे दहा वाजता शिवसेना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीचे व नविन पदाधिकाºयांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आल्याचे व्हॉटस अ‍ॅप संदेशात नमुद करण्यात आले होते. माध्यमांना देखील हीच माहिती देण्यात आली होती. तथापि, बुधवारी (दि. २५) मात्र खासदार राऊत यांनी नगरसेवकांना बोलविलेच नसल्याचा दावा केल्याने नगरसेवक हे लोकप्रतिनिधी नव्हेत काय असाही प्रश्न शिवसेनेतूनच केला जात आहे. सदरच्या बैठकीसाठी मंगळवारी नगरसेवकांना दूरध्वनी करण्यात आले, त्याच वेळी नगरसेवकांच्या नाराजीमुळे ते बैठकीस उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. आणि प्रत्यक्षात घडलेही तसेच बुधवारी (दि.२५) सकाळी झालेल्या बैठकीस महापालिकेत निवडून आलेल्या ३५ नगरसेवकांपैकी अवघे पाच जण उपस्थित होते, असे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे दुपारी खासदार राऊत यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी याविषयावरून विचारणा केल्यानंतर त्यांनी ही नगरसेवकांची नव्हे तर केवळ पदाधिकाºयांची बैठक होती, असा दावा केला. विधान परिषद निवडणूकीसंदर्भात बैठक असली तरी स्थानिक स्वराज्य संस्था हा वेगळा मतदार संघ असतो अािण त्याचे निकषही वेगळे असतात. त्यासंदर्भात नगरसेवकांची बैठक स्वतंत्ररीतीने घेतली जाते असेही ते म्हणाले. विधान परिषदेसाठी पक्षाने नरेंद्र दराडे यांची अधिकृतरीत्या घोेषणा केली ओ. सध्या पक्षाचे २१२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात आहेत. मात्र प्रत्यक्षात चारशे मते पक्षाच्या उमेदवाराला मिळतील असा दावाही त्यांनी केला.

Web Title: Corporators will get the meeting of Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.