उपनगरला हॉकर्स झोनची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 01:19 AM2018-02-25T01:19:26+5:302018-02-25T01:19:26+5:30

उपनगर नाक्यावरील जॉगिंग ट्रॅकच्या जागेवर मनपा प्रशासनाने हॉकर्स झोनची निर्मिती केली असून, उपनगरच्या मुख्य रस्त्यावरील भाजीपाला, फळे तसेच इतर व्यावसायिकांचे या हॉकर्स झोनमध्ये स्थलांतर करण्यासाठी संबंधित व्यावसायिकांना मनपा अधिकाºयांनी बसण्यासाठी त्यांची जागा निश्चित करून दिली.

Construction of Hawker's Zone in the suburbs | उपनगरला हॉकर्स झोनची निर्मिती

उपनगरला हॉकर्स झोनची निर्मिती

Next

उपनगर : उपनगर नाक्यावरील जॉगिंग ट्रॅकच्या जागेवर मनपा प्रशासनाने हॉकर्स झोनची निर्मिती केली असून, उपनगरच्या मुख्य रस्त्यावरील भाजीपाला, फळे तसेच इतर व्यावसायिकांचे या हॉकर्स झोनमध्ये स्थलांतर करण्यासाठी संबंधित व्यावसायिकांना मनपा अधिकाºयांनी बसण्यासाठी त्यांची जागा निश्चित करून दिली.  मनपा प्रशासनाकडून जॉगिंग ट्रॅकच्या जागेवर साफसफाई करून हॉकर्स झोनची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी मनपा अधिकाºयांनी शुक्रवारी संबंधित व्यावसायिकांना मार्किंग करून त्यांना नंबर टाकून बसण्याची जागा निश्चित करून दिली आहे. जॉगिंग ट्रॅकवर ६५ व्यावसायिकांना प्रत्येकी ५ फुटांची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मनपा प्रशासनाकडून विक्रेत्यांना जागा निश्चित करून दिल्यानंतर विक्रेत्यांनी आपले हातगाडे व इतर साहित्य त्या ठिकाणी आणून दुकान थाटण्यास सुरुवात केली आहे. यामुळे उपनगरचा मुख्य रस्ता मोकळा श्वास घेऊ लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
मातोश्रीनगरच्या भाजीबाजाराचे स्थलांतर गरजेचे
शांतीपार्क डीपी रोडवरील भाजीबाजाराचेही जॉगिंग ट्रॅकवरील हॉकर्स झोनमध्ये स्थलांतर केल्यास तेथील व्यावसायिकांनाही हक्काची जागा उपलब्ध होईल. त्यामुळे शांतीपार्क-मातोश्रीनगर रस्त्यावर वाहतुकीस अडचणीचा ठरणारा हा भाजीबाजार स्थलांतरित करणे गरजेचे बनले आहे.

Web Title: Construction of Hawker's Zone in the suburbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.