राफेल विमान प्रकरणी कॉँग्रेसचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:16 AM2018-09-12T00:16:35+5:302018-09-12T00:28:35+5:30

राफेल विमान खरेदी प्रकरणात चाळीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून, विरोधी पक्ष, मंत्रिमंडळाच्या संरक्षण विषयक समितीला अंधारात ठेवून विमान खरेदीचा करार करण्यात आला आहे़ या भ्रष्टाचाराबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करूनही पंतप्रधान मोदी यावर बोलत नाहीत़ नोटाबंदी, जीसएसटी, पेट्रोलचे भाव कमी करण्यात सरकारची हतबलता ही मोदी सरकारच्या काळात देशाचे अर्थकारण बिघडल्याचे सूचित करते़ अशा या हुकूमशाही, भ्रष्टाचारी व सर्वसामान्यांची पिळवणूक करणाºया मोदी सरकारला जाब विचारण्याची वेळ आल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले़

Congress Front in Raphael | राफेल विमान प्रकरणी कॉँग्रेसचा मोर्चा

राफेल विमान प्रकरणी कॉँग्रेसचा मोर्चा

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सहभागी

नाशिक : राफेल विमान खरेदी प्रकरणात चाळीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून, विरोधी पक्ष, मंत्रिमंडळाच्या संरक्षण विषयक समितीला अंधारात ठेवून विमान खरेदीचा करार करण्यात आला आहे़ या भ्रष्टाचाराबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करूनही पंतप्रधान मोदी यावर बोलत नाहीत़ नोटाबंदी, जीसएसटी, पेट्रोलचे भाव कमी करण्यात सरकारची हतबलता ही मोदी सरकारच्या काळात देशाचे अर्थकारण बिघडल्याचे सूचित करते़ अशा या हुकूमशाही, भ्रष्टाचारी व सर्वसामान्यांची पिळवणूक करणाºया मोदी सरकारला जाब विचारण्याची वेळ आल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले़
केंद्रातील मोदी व राज्यातील फडणवीस सरकारकडून जनतेची सुरू असलेली फसवणूक, राफेल खरेदीतील अनियमितता, पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर, बेरोजगारी, शेतकरीविरोधी धोरणे, भ्रष्टाचार या विरोधात शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (दि़ ११) शहरातून मोर्चा काढण्यात आला होता़ या मोर्चाच्या समारोपप्रसंगी चव्हाण बोलत होते,
राफेल विमान खरेदी भ्रष्टाचाराबाबत बोलताना ते म्हणाले की, संरक्षणात महत्त्वाची भूमिका असलेल्या हवाई दलासाठी उच्च प्रतिची विमाने खरेदीचा मुद्दा २००० मध्ये चर्चेत आला़ यावर यूपीए सरकारने विविध देशांकडून निविदा मागवून ६३० ते ६५० कोटी रुपये किमतीची १२६ राफेल विमाने खरेदीचा निर्णय घेतला़ यापैकी १८ विमाने ही फ्रान्सकडून, तर १०८ विमाने ही एचएएच कंपनीत तयार केली जाणार होती़
पंतप्रधान मोदी हे २०१५ मध्ये फ्रान्सच्या दौºयावर गेल्यानंतर त्यांनी हा करार रद्द केला व प्रत्येकी १६६० कोटी रुपये किमतीची ३६ विमाने खरेदी करण्याचा करार केला़ यातील प्रत्येक विमानासाठी १०५० ते १०६० कोटी रुपये अतिरिक्त देण्यात आले असून, यामध्ये ४० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे़ याबरोबरच विमान निर्मितीचे ३० हजार कोटी रुपयांचे काम एचएएल या अनुभवी कंपनीऐवजी काही दिवसांपूर्वीच तयार झालेल्या रिलायन्स कंपनीला देण्यात आले़ या विमान खरेदीतील भ्रष्टाचाराबाबत पंतप्रधान संसदेत उत्तरे देत नाही़ त्या घोटाळ्याची व्याप्ती जनतेपर्यंत पोहोचावी, यातील दोषींची चौकशी व्हावी यासाठी कॉँग्रेसतर्फे मोर्चा काढून जनजागृती केली जात असल्याचे चव्हाण यांनी सांगितले़
महात्मा गांधीरोडवरील काँग्रेस कार्यालयापासून या मोर्चास सुरुवात झाली़ मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मेनरोड, रेडक्रॉस सिग्नल, शालिमारमार्गे हा मोर्चा डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोर्चाचा समारोप झाला़ यानंतर काँग्रसचे शहराध्यक्ष शरद अहेर, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे व पदाधिकाºयांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ यावेळी मोर्चेकºयांनी भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली़ या मोर्चामध्ये माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, नगरसेवक हेमलता पाटील, शाहू खैरे, डॉ. तुषार शेवाळे, अश्विनी बोरस्ते, कल्पना पांडे, ज्ञानेश्वर काळे, ज्ञानेश्वर गायकवाड, रमेश कहांडळे, वत्सला खैरे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़


एमजी रोडवर वाहतूक कोंडी
महात्मा गांधी रोडवरील काँग्रेस कार्यालयापासून दुपारी बारा वाजेच्या सुमारास मोर्चास सुुरुवात होणार असल्याने मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते जमले होते़ मात्र, जागा मिळेल तिथे वाहने उभी करण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती़ या ठिकाणी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे मेहेर, शालिमार, रविवार कारंजा, मेनरोड, अशोकस्तंभ अशा सर्वच ठिकाणच्या वाहतुकीवर परिणाम झाला़ यामुळे वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक झाली़

Web Title: Congress Front in Raphael

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.