नाशिकची जागा मागून कॉँग्रेसकडून भुजबळांची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 01:34 AM2018-11-20T01:34:35+5:302018-11-20T01:35:14+5:30

लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून राष्टवादीकडून छगन भुजबळ उमेदवारी करणार नसतील तर ही जागा कॉँग्रेसला सोडण्यात यावी, अशी आग्रही मागणी करून कॉँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी करण्यासाठी अनेकांनी इच्छा प्रदर्शित केल्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्टवादी व पर्यायाने छगन भुजबळ यांची राजकीय कोंडी झाल्याचे मानले जात आहे.

 Congress demands Bhujbal's demand for Nasik's place | नाशिकची जागा मागून कॉँग्रेसकडून भुजबळांची कोंडी

नाशिकची जागा मागून कॉँग्रेसकडून भुजबळांची कोंडी

Next

नाशिक : लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून राष्टवादीकडून छगन भुजबळ उमेदवारी करणार नसतील तर ही जागा कॉँग्रेसला सोडण्यात यावी, अशी आग्रही मागणी करून कॉँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी करण्यासाठी अनेकांनी इच्छा प्रदर्शित केल्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्टवादी व पर्यायाने छगन भुजबळ यांची राजकीय कोंडी झाल्याचे मानले जात आहे.  भुजबळ हे लोकसभेत जाणार की विधानसभेत यावर अद्याप
निर्णय झालेला नसला तरी, नाशिकच्या जागेवर भुजबळ कुटुंबीयातील कोणीतरी उमेदवारी करणार असल्याने त्यादृष्टीने तयारी केली जात आहे.  अशा परिस्थितीत कॉँग्रेसच्या जागा मागणीमुळे नवीन राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  नाशिक लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला असून, माधवराव पाटील, देवीदास पिंगळे, समीर भुजबळ यांनी या मतदारसंघातून विजयश्री प्राप्त केली असून, २०१४ च्या निवडणुकीत मात्र छगन भुजबळ यांच्यासारख्या राज्यस्तरीय मातब्बर नेत्याला पराभवाची धूळ चाखावी लागली होती.  असला तरी, गेल्या काही महिन्यांपासून स्वत: छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ हे दोन्हीही लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागले आहेत. सामाजिक, राजकीय प्रश्नांची तड लावण्याबरोबरच अगदी पक्ष संघटनेच्या कामातही दोघांनी झोकून घेतल्यामुळे त्याचा संबंध निवडणूक तयारीशी जोडला जात आहे. कॉँग्रेसला ही सारी परिस्थिती ज्ञात असतानाही त्यांनी मुंबईत पक्ष श्रेष्ठींकडे नाशिकच्या जागेवर हक्क सांगून उमेदवारीसाठी तयारीही दर्शविल्यामुळे राष्टÑवादी व खुद्द भुजबळ परिवार पेचात पडला आहे. विशेष म्हणजे राष्टÑवादीकडून स्वत: छगन भुजबळ उमेदवारी करणार असतील तर जागा नको, अशी भूमिकाही कॉँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने घेतल्यामुळे भुजबळ यांच्या व्यतिरिक्त अन्य उमेदवाराला कॉँग्रेसची पसंती नाही, असा त्यातून अर्थ काढला जात आहे. मध्यंतरी भुजबळ यांनी लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यामुळेच कदाचित कॉँग्रेसने नाशिकच्या जागेवर दावा ठोकून भुजबळ यांची राजकीय कोंडी केल्याचा अर्थ काढला जात आहे.
युतीचे पाच आमदार
सद्यस्थितीत या मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात राष्टÑवादीचा एकही आमदार नाही. उलट मित्रपक्ष भाजपा-सेनेचे या मतदारसंघावर वर्चस्व असून, भाजपाचे तीन, तर सेनेचे दोन आमदार कार्यरत आहेत, एका मतदारसंघात कॉँग्रेसचे आमदार आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवेन का असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

Web Title:  Congress demands Bhujbal's demand for Nasik's place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.