छाननीनंतर उमेदवारी घोषित करण्याची व्यूहरचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 01:02 AM2018-11-28T01:02:38+5:302018-11-28T01:03:23+5:30

नाशिक मर्चंट को-आॅपरेटिव्ह बॅँकेच्या निवडणुकीसाठी आता चार पॅनल सज्ज होत असले तरी कोणत्याही पॅनलच्या प्रवर्तकांनी आपले अंतिम उमेदवार घोषित करण्यासाठी गुरुवारी (दि.२९) छाननीनंतरचा मुहूर्त शोधला आहे. बहुतांशी उमेदवार माघारीनंतरच घोषित केले जाण्याची चिन्हे आहेत.

 Configuration to declare candidacy after scrutiny | छाननीनंतर उमेदवारी घोषित करण्याची व्यूहरचना

छाननीनंतर उमेदवारी घोषित करण्याची व्यूहरचना

Next

नामको बॅँक निवडणूक

नाशिक : नाशिक मर्चंट को-आॅपरेटिव्ह बॅँकेच्या निवडणुकीसाठी आता चार पॅनल सज्ज होत असले तरी कोणत्याही पॅनलच्या प्रवर्तकांनी आपले अंतिम उमेदवार घोषित करण्यासाठी गुरुवारी (दि.२९) छाननीनंतरचा मुहूर्त शोधला आहे. बहुतांशी उमेदवार माघारीनंतरच घोषित केले जाण्याची चिन्हे आहेत.
नाशिक मर्चंट बॅँकेत यंदा अभुतपूर्व चुरस दिसत आहे. हुकूमचंद बागमार यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सर्व जुन्या संचालकांनी प्रगती पॅनल तयार केले असून, त्यांना पारंपरिक सहकार पॅनलचे आवाहन आहे. हुकूमचंद बागमार यांचे सुपुत्र अजित बागमार यांनी नम्रता पॅनल नाव घेऊन निवडणूक रिगंणात आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे, तर अ‍ॅड. श्रीधर व्यवहारे यांच्या नेतृत्वाखाली नव्याने प्रामाणिक पॅनल उभे राहिले आहे. एका पॅनलकडून एखाद्या इच्छुकाला उमेदवार म्हणून संधी मिळू लागताच प्रतिस्पर्धी पॅनलचे नेते संबंधितांवर दबाव आणून त्याला निवडणूक रिंगणात उतरूच देत नाहीत त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहेत.
बागमार समर्थकांच्या प्रगती पॅनलमध्ये किमान तीन ते चार जागांवर नव्या उमेदवारांना देण्याची तयारी असून, त्यासाठी अनेक उमेदवार चर्चेत आहेत. मात्र, गुरुवारी (दि.२९) नंतरच उमेदवार घोषित करू, असे सांगितले जात आहे. हीच भूमिका सहकार पॅनलने घेतली असून त्यांनीदेखील माघारीनंतरच सर्व उमेदवार घोषित होतील, असे सांगितले. अजित बागमार यांच्या पॅनलचे आठ, तर व्यवहारे यांच्या पॅनलने चार उमेदवार घोषित केले असून, तेदेखील छाननीनंतरच उमेदवार घोषित करणार आहेत.

Web Title:  Configuration to declare candidacy after scrutiny

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.