दोन तासांच्या मेगा ब्लॉकनंतर गर्डरचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 12:46 AM2019-02-15T00:46:27+5:302019-02-15T00:46:47+5:30

नाशिक, सिन्नर, घोटी, इगतपुरीसह तालुके जोडणारा भगूर रेल्वे गेट जवळच असलेल्या रेल्वेच्या उड्डाणपुलावर ‘बो स्ट्रिंग गर्डर’चे काम रेल्वेच्या दोन तासांच्या मेगाब्लॉकमध्ये यशस्वीपणे पार पडले.

Complete the girder work after a two-hour mega block | दोन तासांच्या मेगा ब्लॉकनंतर गर्डरचे काम पूर्ण

दोन तासांच्या मेगा ब्लॉकनंतर गर्डरचे काम पूर्ण

googlenewsNext
ठळक मुद्देभगूर रेल्वे गेट : उड्डाणपुलावरील बो स्ट्रिंग या ४५ मीटर लांब गर्डरचे काम

नाशिक : नाशिक, सिन्नर, घोटी, इगतपुरीसह तालुके जोडणारा भगूर रेल्वे गेट जवळच असलेल्या रेल्वेच्या उड्डाणपुलावर ‘बो स्ट्रिंग गर्डर’चे काम रेल्वेच्या दोन तासांच्या मेगाब्लॉकमध्ये यशस्वीपणे पार पडले.
भगूरच्या रेल्वे गेटवर रहदारीची गैरसोय दूर करण्यासाठी व नाशिक-सिन्नर-इगतपुरी या तालुक्यांना जोडणारा रेल्वेच्या लाईनवरील उड्डाणपूल उभारण्याच्या कामासाठी पाच वर्षांपूर्वी भूमिपूजन करण्यात आले होते. कामाची मुदत दोन वर्षांची असताना पाच वर्षांनंतरही काम पूर्णत्वास जात नसल्याने जनतेत नाराजी व्यक्त केली जात होती. विशेष म्हणजे या प्रकल्पांतर्गत भगूर गावालगत बोगदा होणार होता, पण तशी कोणतीही कारवाई होत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
गुरुवारी सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी ह्यबो स्ट्रिंग गर्डरह्ण च्या कामाला कार्बोन इंफ्राटेकने सुरुवात केली. सुमारे ४५ मीटर लांब व बारा मीटर रुंद अवजड वजनाच्या या गर्डरला पुलाच्या दुतर्फा बसविण्यात आले. कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, प्रोजेक्ट मेनेजर एम. व्ही. पवार आदींसह रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सीआरएफ निधीमार्फत २७ कोटी ४० लक्ष मंजूर करून उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले. या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, पूर्ण होण्यास किती कालावधी लागतो, याबाबत शंका व्यक्त होत आहे.

Web Title: Complete the girder work after a two-hour mega block

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.