वितरण कंपनीच्या विरोधात तक्रारीचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 06:32 PM2018-10-12T18:32:47+5:302018-10-13T00:42:08+5:30

वायरमन नाही, वायर नाही, सिंगल फेजींग असतांना वीजेचे जाणे येणे, भारनियमन, वीजेचे गट्टे उपलब्ध नसणे,रोहीत्र बिघडले तर तीन ते सहा महिने मिळत नाही, आॅईल नाही, रोहीत्र घेण्यासाठी केली जाणारी पैशांची मागण तर वीज वितरणचे कर्मचारी ‘‘ पंटरमार्फत ’’वीजेची केली जाणारी कामे, पुन्हा त्यांना पैसे द्यावे लागतात असा आरोप बैठकीत उघडपणे विजवितरण कपंनीच्या विरोधात शेतकºयांनी केल्याने उपस्थित अधिकारी अवाक झाले.

Complaint against the distribution company | वितरण कंपनीच्या विरोधात तक्रारीचा पाढा

वितरण कंपनीच्या विरोधात तक्रारीचा पाढा

Next
ठळक मुद्देचांदवड : दुष्काळात शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची राहुल अहेर यांचे आवाहन

चांदवड : वायरमन नाही, वायर नाही, सिंगल फेजींग असतांना वीजेचे जाणे येणे, भारनियमन, वीजेचे गट्टे उपलब्ध नसणे,रोहीत्र बिघडले तर तीन ते सहा महिने मिळत नाही, आॅईल नाही, रोहीत्र घेण्यासाठी केली जाणारी पैशांची मागण तर वीज वितरणचे कर्मचारी ‘‘ पंटरमार्फत ’’वीजेची केली जाणारी कामे, पुन्हा त्यांना पैसे द्यावे लागतात असा आरोप बैठकीत उघडपणे विजवितरण कपंनीच्या विरोधात शेतकºयांनी केल्याने उपस्थित अधिकारी अवाक झाले.
असता वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंग जनवीर यांनी सर्वच शाखा अभियंता व कार्यकारी अभियंता यांना कामाबाबत अशा प्रकारच्या तक्रारी येत असेल तर त्या अधिकाºयांची गय केली जाणार नाही तर वेळप्रसंगी त्यांना घरी पाठवू असा सज्जड दमही त्यांनी दिला तर चांदवड तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे.
शेतकºयांना पावसाने साथ दिली नाही तर कमीत कमी विजवितरण कंपनीने साथ द्यावी अशी अपेक्षा आमदार डॉ. राहुल अहेर यांनी व्यक्त केली तर जनवीर यांनी चांदवड तालुक्यातील तक्रारीमध्ये येत्या महिनाभरात सुधारणा न झाल्यास संबधीत अधिकारी व कर्मचाºयांना जाब विचारु दरम्यान शेतकºयांनी व नागरीकांनी आपले विज वितरण कंपनीचे कामे करुन घेतांना वीज वसुलीकडे लक्ष द्यावे व वीजचोरी करु नये असे आवाहन जनवीर यांनी बैठकीत केले.
या बैठकीत वडाळीभोई उपकेंद्रातील शाखा अभियंता सुनील गांगुर्डे यांचेवर सोग्रसचे भास्करराव गांगुर्डे, सुभाष पुरकर, निवृत्ती घुले, वसंत पगार, विलास भवर, नितीन अहेर, काका काळे, संपतराव पाटील, चंद्रकांत पाटील यांनी समोरासमोर आरोप करीत हे अधिकारी नागरीकांना चांगली उत्तरे देत नाहीत तर वीज वितरणांची कामे एका ‘‘पंन्टरकडून ’’ करतात रोहीत्र नादुरुस्त होऊन तीन महिने झाले तरी त्याकडे लक्ष दिले जात नाही तर पैसांची मागणी केली जाते असा आरोप केल्याने मुख्यअभियंता जनवीर यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले तर यावेळी शिंगवे येथील किरण बोरसे यांनी शिंगवे परिसरातील वीजेचा गट्टा कायमस्वरुपी जळतो व वीजेचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी वारंवार सांगुनही ती कामे केली जात नाही असे सांगीतले तर वायरमन, वीजेचे भारनियमन, वायरमन नाही, अशा तक्रारीचा पाढा चांदवडचे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, शिवसेना उपप्रमुख नितीन अहेर, विलास ढोमसे, पुरीचे बापु भवर,पुरीचे गांगुर्डे आदिसह ग्रामीण भागातील नागरीकांनी व शेतकºयांनी मांडल्या तर चांदवड येथील फिल्टर युनिटचे लोखंडे व श्रीमती मानकर यांची कार्यालयात अत्यंत अरेरावी असून ते शेतकºयांना व लोकप्रतिनिधीना व्यवस्थीत उत्तरे देत नाहीत असा आरोप नितीन अहेर व अनेकांनी बैठकीत केला. ही बैठक तब्बल तीन ते साडेतीन तास चालली यावेळी प्रभाकर ठाकरे, मनोज शिंदे, अ‍ॅड. शांताराम भवर, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, अण्णासाहेब शिंदे, भीमराव निरभवणे, गणपत ठाकरे, विठ्ठल आवारे, देवीदास अहेर, बाळासाहेब शेळके, आदिसह चांदवड तालुक्यातील नागरीक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Complaint against the distribution company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.