ग्राहक संरक्षण समितीकडे वीज कंपनीविरुद्ध तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 01:32 AM2018-02-25T01:32:55+5:302018-02-25T01:32:55+5:30

जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या बैठकीत वीज वितरण कंपनीच्या विरोधात समिती सदस्यांनी तक्रारींचा पाढा वाचून जंत्रीच सादर केली. दोन वर्षांपासून तक्रारी करूनही वीज कंपनी सोडवणूक करीत नसल्याने कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी यावेळी सदस्यांनी केली.

 Complaint against the Consumer Protection Committee against the electricity company | ग्राहक संरक्षण समितीकडे वीज कंपनीविरुद्ध तक्रारी

ग्राहक संरक्षण समितीकडे वीज कंपनीविरुद्ध तक्रारी

Next

नाशिक : जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या बैठकीत वीज वितरण कंपनीच्या विरोधात समिती सदस्यांनी तक्रारींचा पाढा वाचून जंत्रीच सादर केली. दोन वर्षांपासून तक्रारी करूनही वीज कंपनी सोडवणूक करीत नसल्याने कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी यावेळी सदस्यांनी केली.  या तक्रारींमध्ये प्रामुख्याने वीज वितरण कंपनीच्या नियमानुसार प्रत्येक वीज ग्राहकास फोटोमीटर रिडिंगनुसारच वीज बिल देण्यात यावे, असे ठरलेले असताना दिंडोरी तालुक्यातील मातेरेवाडी येथील १७५ शेतकºयांना गेल्या आठ वर्षांपासून अंदाजे व खोटी, अवास्तव वीज बिले देण्यात येत असल्याने सदर शेतकºयांच्या वीज बिलांत दुरुस्ती करण्यात यावी व त्यांना वीज कंपनीने भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय सिन्नर तालुक्यातील वीज ग्राहक ठोंबरे यांना विजेचा पुरवठा करणारा वीज पोल पडला त्याबाबत वीज कंपनीकडे तक्रार करूनही विजेचा पोल दुरुस्त करण्यात आला नाही. परिणामी वीजपुरवठा खंडित झाल्याने ठोंबरे यांचे पीक बुडाले, त्यास वीज कंपनीच जबाबदार असल्याची तक्रार करण्यात आली असून, ठोंबरे यांनी तक्रार केल्यापासून प्रतिदिन वीज कंपनीने १२०० रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. वीज ग्राहकांचे हक्क व अधिकार तसेच भरपाईचे निश्चितीकरणाबाबत वीज कंपनीने त्यांच्या प्रत्येक वीज बिल भरणा केंद्रावर तसेच ग्रामपंचायत कार्यालयांवर फलक लावावेत. त्याचबरोबर वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी, अधिकाºयांनी गणवेश परिधान करावा व त्यावर नेमप्लेट लावण्याचा नियम असून, तसे न केल्यास संबंधिताना दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. परंतु अधिकारी व कर्मचारी त्याचे पालन करीत नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.
निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत वीज तक्रारींची तत्काळ सोडवणूक करण्याचे आदेश संबंधित अधिकाºयांना देण्यात आले, त्याचबरोबर बैठकीच्या इतिवृत्तात त्याची नोंद घेऊन पुढच्या बैठकीत तक्रारींवर वीज कंपनीने काय कार्यवाही केली, याचा अहवालही ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Web Title:  Complaint against the Consumer Protection Committee against the electricity company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक