वैयक्तिक रेडीमेड शौचालयाचे अनुदान मिळत नसल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:12 AM2018-02-25T00:12:37+5:302018-02-25T00:12:37+5:30

स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधण्यात येणाºया वैयक्तिक रेडीमेड शौचालयाचे अनुदान लाभार्थींना मिळाले नसल्याची तक्रार के. पा. नगर येथील प्रकाश सूर्यभान कातकाडे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Complaint about not getting personalized readymade toilets | वैयक्तिक रेडीमेड शौचालयाचे अनुदान मिळत नसल्याची तक्रार

वैयक्तिक रेडीमेड शौचालयाचे अनुदान मिळत नसल्याची तक्रार

googlenewsNext

सिन्नर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधण्यात येणाºया वैयक्तिक रेडीमेड शौचालयाचे अनुदान लाभार्थींना मिळाले नसल्याची तक्रार के. पा. नगर येथील प्रकाश सूर्यभान कातकाडे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-ºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.  स्वच्छ भारत अभियानांतर्गत आपण शौचालयाची कामे केली असून, कामांचे पैसे असताना लाभार्थींना धनादेश दिले जात नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. रेडीमेड शौचालयास मान्यता नसतानाही दुसºया ठेकेदाराकडून कामे करून घेतली जात आहेत.सदर शौचालय हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार ग्रामसेवक व सरपंच यांना माहिती असून, सदर कामाची चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, काही ग्रामस्थांनीही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे शौचालयाचे अनुदान मिळत नसल्याची तक्रार केली आहे. गावातील लाभार्थींच्या नावे पंचायत समितीकडून शौचालय बांधकाम अनुदान ग्रामपंचायतीकडे जमा झाले आहेत; मात्र सरपंच नारायण बोडके व ग्रामसेवक प्रत्येक लाभार्थीकडे पैशांची मागणी करून अनुदानाचे धनादेश द्यायला टाळाटाळ करीत असल्याचे म्हटले आहे. बांधलेल्या शौचालयाचा वापर दोन महिन्यांपासून सुरू असताना सरपंच मात्र अनुदानाच्या धनादेशावर स्वाक्षºया करत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
कोणत्याही लाभार्थीकडे पैशांची मागणी केली नाही. थकबाकी वसुलीचे प्रमाण अत्यल्प असल्याने मासिक बैठकीत ठराव करण्यात आला आहे. त्यानुसार थकीत घरपट्टी व पाणीपट्टी भरल्याखेरीजकुणालाही दाखले व शासकीय लाभ द्यायचा नाही हे बैठकीतच सर्वानुमते ठरले आहे. ग्रामपंचायतीचा वसुली द्या आणि शौचालय बांधणीचे अनुदान घ्या असा विषय आहे. अन्य कुणाही ठेकेदाराला काम करायला सांगितले नाही. आरोप राजकीय हेतूने प्रेरित असून, चुकीचे आहेत.  - नारायण बोडके, सरपंच, के. पा. नगर

Web Title: Complaint about not getting personalized readymade toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.