नाशिक : सत्ताधारी भाजपाने नव्याने तीन विषय समित्या गठित केल्या. परंतु, त्यांचे अधिकार, कर्तव्ये याबाबत विरोधकांनी सवाल उपस्थित केल्यानंतर नगरसचिव विभागाने आता येत्या गुरुवारी (दि.२०) होणाऱ्या महासभेवर प्रस्ताव ठेवला आहे.
महापालिकेत बहुमत संपादन केलेल्या भाजपाने जास्तीत जास्त सदस्यांना सत्तापदे मिळावीत यासाठी विधी, आरोग्य आणि शहर सुधार या तीन समित्या पुनर्गठित केल्या. मात्र, सदर समित्यांचे अधिकार व कर्तव्ये काय, समित्यांवर कोणते प्रस्ताव ठेवणार याबाबतचे प्रश्न कॉँग्रेस-राष्ट्रवादीने उपस्थित केले होते.
महापालिकेने त्याबाबत कायदेशीर मतही मागविले होते. आता, तीनही समित्यांच्या कार्यकक्षा निश्चित करण्यासाठी महासभेवरच प्रस्ताव ठेवला असून, महासभा काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागून आहे.