आयुक्त आॅस्ट्रेलियाला, लक्ष मात्र नाशिककडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 01:33 AM2018-10-23T01:33:15+5:302018-10-23T01:33:32+5:30

महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे अखेरीस विदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. मात्र, त्यांनी आपल्या गैरहजेरीत केलेल्या कामांचा आठ दिवसांत अहवाल देण्यास सांगितले आहे. दुसरीकडे ते रजेवर न जाता दौºयावर गेल्याने अतिरिक्तकार्यभार अन्य कोणाकडे न देता आयुक्तांच्या गैरहजेरीत अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्याकडे कार्यभार देण्यात आला आहे.

 Commissioner of Australia, Lakshakan, Nashik | आयुक्त आॅस्ट्रेलियाला, लक्ष मात्र नाशिककडे

आयुक्त आॅस्ट्रेलियाला, लक्ष मात्र नाशिककडे

Next

नाशिक : महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे अखेरीस विदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. मात्र, त्यांनी आपल्या गैरहजेरीत केलेल्या कामांचा आठ दिवसांत अहवाल देण्यास सांगितले आहे. दुसरीकडे ते रजेवर न जाता दौºयावर गेल्याने अतिरिक्तकार्यभार अन्य कोणाकडे न देता आयुक्तांच्या गैरहजेरीत अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्याकडे कार्यभार देण्यात आला आहे.  नाशिक शहर स्मार्ट करण्यासाठी कंपनी स्थापन करण्यात आली असून, कंपनीच्या संचालकांसाठी विदेशात प्रशिक्षण, कार्यशाळा तसेच प्रत्यक्ष प्रकल्प पाहणी दौरे आयोजित करण्यात आले आहेत. अलीकडेच स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल कोरिया दौरा करून परतले. ते नाशिकमध्ये येत नाही तोच आयुक्त तुकाराम मुंढे हे रविवारी (दि.२१) आॅस्ट्रेलिया दौºयावर रवाना झाले आहेत.  आठ दिवसांच्या दौºयावर ते रवाना झाले असले तरी त्यांनी हा दौरा असून, रजा नसल्याने महापालिका बाह्य समकक्ष अधिकाºयाकडे कार्यभार न देता महापालिकेचे अतिरिक्तआयुक्त किशोर बोर्डे यांच्याकडे सोपवला आहे. आठ दिवस आयुक्त नसताना खाते प्रमुखांनी काय कामे केलीत  त्याचा तपशीलवार अहवाल तयार करून तो सादर करण्यात आयुक्तांनी संबंधितांना बजावले आहे. दुसरीकडे किशोर बोर्डे यांनी सोमवारी खातेप्रमुखांची साप्ताहिक बैठक घेतली आणि कामकाजाचा आढावा घेतला.
नाशिक शहर स्मार्ट करण्यासाठी नियुक्त कंपनीत सध्या विदेश दौºयांचे वारे असून, केवळ अधिकारीच विदेश दौºयात जात आहेत. अन्य संचालक विशेषत: लोकप्रतिनिधी संचालक अंधारात आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारे या दौºयांची माहितीही दिली जात नाही. किंबहूना त्यांना कळविले जात नसल्याचे वृत्त आहे.

Web Title:  Commissioner of Australia, Lakshakan, Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.