मालेगाव : येथील सामान्य रुग्णालयाच्या इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आलेल्या नर्सिंग कॉलेजची पाहणी व प्रशिक्षणार्थींशी चर्चा करून ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी अडीअडचणी जाणून घेतल्या तसेच येत्या आठ दिवसात नवीन इमारतीत प्रशिक्षण व एका महिन्याच्या आत निवासाची सोय पूर्ण केली जाणार असल्याची माहिती भुसे यांनी पत्रकारांना दिली.
महाराष्टÑ परिचर्या परिषदेच्या मंजुरीनंतर गेल्या २८ आॅगस्टपासून नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात आले आहे. कॉलेज व वसतिगृहाच्या कामास चार कोटी २७ लाख रुपयांची आवश्यकता आहे. दोन्ही इमारतींचे काम अंतिम टप्प्यात आहे. ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र भारतीय परिचर्या परिषद व स्वास्थ्य परिवार कल्याण मंत्रालय नवी दिल्ली यांनी एएनएम (मिडवाईफ नर्स) जीएनएम (अधिपरिचर्या) या अभ्यासक्रमासाठी ४० विद्यार्थिनींना प्रवेश देण्याचे निश्चित केले होते. सदरचे कॉलेज २८ आॅगस्टपासून येथील सामान्य रुग्णालयात सुरू करण्यात आले आहे.
प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींच्या अडीअडचणी व इमारतीच्या कामाची पाहणी करण्यासाठी बुधवारी ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी सामान्य रुग्णालयात अचानक भेट दिली. यावेळी विद्यार्थिनींशी संवाद साधत अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच इमारतीच्या उर्वरित कामासाठी दुसºया टप्प्याच्या निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. नर्सिंग कॉलेजला मान्यता लवकर मिळावी यासाठी तातडीने महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी प्रशिक्षण घेणाºया विद्यार्थिनींना योग्य सुविधा व त्यांच्या सुरक्षततेबाबत योग्य काळजी घेतली जात आहे. या संबंधीच्या सूचना ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे व नर्सिंग कॉलेजच्या कर्मचाºयांना दिल्या आहेत.
भुसे यांच्या समवेत सुनिल देवरे, रामा मिस्तरी, राजेश गंगावणे राजेश अलीझाड, विनोद वाघ आदिंसह पदाधिकारी, डॉ. त्रिभुवन उपस्थित होते.नर्सिंग कॉलेजमध्ये सध्या २८ विद्यार्थिनी व २ विद्यार्थी असे ३० विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. एक प्राचार्य व चार शिक्षक कार्यरत आहेत. प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींच्या अडीअडचणी व इमारतीच्या कामांची पाहणी करण्यासाठी बुधवारी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सामान्य रुग्णालयात अचानक भेट दिली. यावेळी विद्यार्थिनींशी संवाद साधत अडीअडचणी जाणून घेतल्या.