सरकारच्या नॅशनल मेडीकल कमीशनच्या निषेधार्थ नाशिकमध्ये वैद्यकिय व्यवसायिकांचा उद्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 04:31 PM2018-01-01T16:31:35+5:302018-01-01T16:33:34+5:30

देशभरातील वैद्यकिय व्यावसायिक मंगळवारी (दि. २) सकाळी सहा ते सायंकाळी सहा असा बारा तासांचा बंद पाळणार आहेत.

Closing of medical practitioners tomorrow in Nashik by protesting against the National Medical Commission's government | सरकारच्या नॅशनल मेडीकल कमीशनच्या निषेधार्थ नाशिकमध्ये वैद्यकिय व्यवसायिकांचा उद्या बंद

सरकारच्या नॅशनल मेडीकल कमीशनच्या निषेधार्थ नाशिकमध्ये वैद्यकिय व्यवसायिकांचा उद्या बंद

Next
ठळक मुद्देसकाळी सहा ते सायंकाळी सहा असा बारा तासांचा बंद अत्यावश्यक रूग्णसेवा सुरू असतील

नाशिक-  केंद्र सरकारच्या नॅशनल मेडीकल कमीशन बील मधील जाचक बदलांच्या निषेधार्थ देशभरातील वैद्यकिय व्यावसायिक मंगळवारी (दि. २) सकाळी सहा ते सायंकाळी सहा असा बारा तासांचा बंद पाळणार आहेत. त्यामुळे रूग्ण सेवेवर प्रतिकुल परिणाम होण्याची शक्यता आहे. अर्थात, अत्यावश्यक रूग्णसेवा सुरू असतील असे आयएमएच्या नाशिक शाखेने स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारच्या वतीने नॅशनल मेडीकल कमीशन बील अंतर्गत मध्ये मोठे फेरबदल करण्यात येणार आहेत. त्यात डॉक्टरांचे प्रतिनिधी घटविण्यात येणार असून त्याऐवजी शासन नियुक्त प्रतिनिधी वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे सरकारच्या ध्येय धोरणांना अनुकूल असे व्यक्त नियुक्त करून सरकारची चुकीची धोरणेही पुढे रेटण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे वैद्यकिय महाविद्यालयांना देखील मान्यता देताना चुकीचे पायंडे पडण्याची शक्यता आहे. याशिवाय नीट सारख्या सामाईक प्रवेश परीक्षेतही मोठे फेरबदल होणार आहेत. त्यामुळे वैद्यकिय व्यावसायिकच नव्हे तर विद्यार्थ्यांना देखील त्रास सहन करावा लागेल. सदरचे विधेयक संसदेत मंगळवारी (दि.२) मांडण्यात येणार असून या लोकशाही विरोधी प्रस्तावाला विरोध करण्यासाठी इंडीयन मेडीकल असोसिएशनने एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला आहे. या दरम्यान, निवेदन देऊन आणि आंदोलने करण्यात येणार असल्याचे आयएमए नाशिकचे अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे यांनी सांगितले. वैद्यकिय व्यवसायिकांच्या वतीने या प्रस्तावित बदलांच्या विधेयकाला विरोध करणाºया विधेयकाला विरोध करावा यासाठी खासदार हेमंत गोडसे यांना सोमवारी (दि.१) निवेदन देण्यात आला.
..
ओपीडी बंद राहणार
आयएमएच्या आवाहनानुसार बाह्य रूग्ण विभाग बंद ठेवण्यात येणार असून शस्त्रक्रिया देखील केल्या जाणार नाहीत. अर्थात, खुपच आवश्यक असेल अशा प्रकारची सर्व कामे आणि शस्त्रक्रिया केल्या जातील.
- डॉ. मंगेश थेटे, नाशिक

 

Web Title: Closing of medical practitioners tomorrow in Nashik by protesting against the National Medical Commission's government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.