येवल्यात कब्रस्तानमध्ये स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 01:51 AM2019-06-10T01:51:35+5:302019-06-10T01:52:55+5:30

येवला : शहरातील नांदगाव-नागडे रोडवरील हिंदुस्तान मशिदीशेजारील बडा कब्रस्तानमध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी (दि. ९) सकाळी ७ ते १०.३० दरम्यान स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

A cleanliness campaign in the graveyard in Yeola | येवल्यात कब्रस्तानमध्ये स्वच्छता मोहीम

येवला येथे बडा कब्रस्तान परिसरात स्वच्छता मोहीम राबविताना नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य व मुस्लीम बांधव.

Next
ठळक मुद्दे या अभियानात येवला, नाशिक येथील १४० सदस्यांसह मुस्लीम बांधवांनी सहभाग

येवला : शहरातील नांदगाव-नागडे रोडवरील हिंदुस्तान मशिदीशेजारील बडा कब्रस्तानमध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी (दि. ९) सकाळी ७ ते १०.३० दरम्यान स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यावेळी सुमारे ३.३ टन कचरा गोळा करण्यात आला. ओला व सुका घनकचरा जमा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या अभियानात येवला, नाशिक येथील १४० सदस्यांसह मुस्लीम बांधवांनी सहभाग नोंदविला.
प्रतिष्ठानतर्फेनाशिक जिल्ह्यात विविध उपक्र म राबविले जातात. रविवारी येथे कब्रस्तान स्वच्छता अभियान उपक्र म राबविण्यात आला.
बडा कब्रस्तान स्वच्छता अभियानात कब्रस्तान ट्रस्टचे अध्यक्ष हाजी अनिसभाई शेख, शहराचे काजी रफियोद्दीन शेख, माजी नगराध्यक्ष हुसेनभाई शेख, नगरसेवक शफीकभाई शेख, अमजदभाई शेख, निसारभाई शेख, माजी नगरसेवक रिजवान शेख, येवला एज्युकेशन अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटीचे चेअरमन अय्युब शहा, सामाजिक कार्यकर्ते दादाभाई फिटर शेख, सय्यद कौसर, ग्रीन कँडल ग्रुपचे अध्यक्ष अन्सारभाई शेख तसेच पदाधिकारी व मुस्लीम बांधव यावेळी सहभागी झाले होते. नगरपालिकेकडून घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली होती.

Web Title: A cleanliness campaign in the graveyard in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक