नाशिकमध्ये गंगाघाटावर स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 07:09 PM2018-12-12T19:09:41+5:302018-12-12T19:10:28+5:30

नाशिक : महापालिकेच्या पंचवटी आरोग्य विभागाच्या वतीने गंगाघाट तसेच रामकुंडात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली महापालिकेच्या ४८ हून अधिक कर्मचाऱ्यांनी ...

 Cleanliness campaign at Gangagatta in Nashik | नाशिकमध्ये गंगाघाटावर स्वच्छता मोहीम

नाशिकमध्ये गंगाघाटावर स्वच्छता मोहीम

Next

नाशिक : महापालिकेच्या पंचवटी आरोग्य विभागाच्या वतीने गंगाघाट तसेच रामकुंडात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली महापालिकेच्या ४८ हून अधिक कर्मचाऱ्यांनी नदीपात्रात उतरून नदीपात्र स्वच्छ केले.
गेल्या अनेक महिन्यांपासून रामकुंड व नदीपात्राची स्वच्छता केली गेली असल्याने त्यातच नदीपात्रात पाणी साचून राहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. रामकुंड येथे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांना दूषित आणि पाण्यातच तीर्थस्नान करावे लागत असल्याने अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त केली होती. महापालिकेच्या पंचवटी विभागातर्फे याबाबत तत्काळ दखल घेऊन विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी संपूर्ण नदीपात्र स्वच्छतेसाठी ४८ कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली. या कर्मचाºयांनी संपूर्ण रामकुंड तसेच रामकुंडाच्या पाय-या व पुढील अन्य कुंडांची साफसफाई केली. यावेळी जेसीबी यंत्राच्या साहाय्याने नदीपात्रातील गाळ, दगड, माती कपडे बाहेर काढण्यात येऊन स्वच्छता करण्यात आली.

 

Web Title:  Cleanliness campaign at Gangagatta in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.