शहर बससेवा महापालिकाच चालविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 01:03 AM2017-09-19T01:03:39+5:302017-09-19T01:03:44+5:30

नाशिक : महापालिकेमार्फत शहर बससेवा चालविण्यास महासभेने वारंवार नकार दिला असला तरी शासन स्तरावर शहर बससेवा महापालिकेच्या ताब्यात देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासनाने समितीही गठित केली आहे.

The city bus service will run the municipal corporation | शहर बससेवा महापालिकाच चालविणार

शहर बससेवा महापालिकाच चालविणार

Next

नाशिक : महापालिकेमार्फत शहर बससेवा चालविण्यास महासभेने वारंवार नकार दिला असला तरी शासन स्तरावर शहर बससेवा महापालिकेच्या ताब्यात देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासनाने समितीही गठित केली आहे. दरम्यान, नाशिक महापालिकेने बससेवा स्वत:हून चालविण्याऐवजी त्या आपल्या नियंत्रणाखाली खासगी कंपनीमार्फत चालविण्याच्या दृष्टीने विचार सुरू केला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. महापालिकेने सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्यासाठी नेमलेल्या खासगी एजन्सीनेही शहरात बससंख्या वाढविण्याची शिफारस करत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याची शिफारस केलेली आहे.
समितीवर अभिषेक कृष्णशासनाच्या नगरविकास विभागाने परिवहन सेवा ताब्यात घेण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी समिती गठित केली आहे. या समितीत सदस्य म्हणून नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीत सदस्य म्हणून परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांचीही नियुक्ती आहे तर सदस्य सचिव म्हणून नगरविकास खात्याच्या सह/उपसचिवांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी शहर बससेवा ताब्यात घेण्याबाबत यापूर्वीच अनुकूलता दर्शविली आहे.

Web Title: The city bus service will run the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.