शहर भाजपाच्या वतीने जल्लोषनिवडणुकांचे निकाल : फटाके फोडून आनंदोत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:25 AM2017-12-19T00:25:39+5:302017-12-19T00:28:32+5:30

नाशिक : गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला विजय मिळाल्यानंतर नाशिक महानगर भाजपातर्फे वसंतस्मृती कार्यालयासमोर फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, नरेंद्र मोदींचा विजय असो आदी घोषणांनी परिसर दणाणला होता.

City BJP's election results: Break the crackers and celebrate carnival celebrations | शहर भाजपाच्या वतीने जल्लोषनिवडणुकांचे निकाल : फटाके फोडून आनंदोत्सव साजरा

शहर भाजपाच्या वतीने जल्लोषनिवडणुकांचे निकाल : फटाके फोडून आनंदोत्सव साजरा

Next
ठळक मुद्देशहर भाजपाच्या वतीने जल्लोषनिवडणुकांचे निकाल : फटाके फोडून आनंदोत्सव साजरा

नाशिक : गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला विजय मिळाल्यानंतर नाशिक महानगर भाजपातर्फे वसंतस्मृती कार्यालयासमोर फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, नरेंद्र मोदींचा विजय असो आदी घोषणांनी परिसर दणाणला होता.
दोन्ही विधानसभा आणि विशेषत: गुजरातचे निकाल काय लागतात याकडे सर्व देशवासीयांचे लक्ष लागले होते. निकाल ऐकण्यासाठी भाजपा कार्यालयात मोठ्या स्क्रीनची व्यवस्थाही करण्यात आली होती. भाजपाच्या बाजूने निकालाचे कल येऊ लागताच पक्ष कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित होत होता. भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर जल्लोषाला एकच सुरुवात झाली. भाजपने विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढविली आणि गुजरात तसेच हिमाचलच्या मतदारांनी भाजपाच्या पारड्यात भरभरून मते टाकली, असे आमदार बाळासाहेब सानप यांनी सांगितले. भाजपा प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, रोहिणी नायडू, ज्येष्ठ नेते विजय साने, जिल्हा अध्यक्ष दादा जाधव आदींचीही यावेळी भाषणे झाली. जल्लोषात विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, महापौर रंजना भानसी, सभागृहनेते दिनकर पाटील, शिवाजी गांगुर्डे, सरचिटणीस प्रशांत जाधव, नाना शिलेदार, पवन भगूरकर, उत्तमराव उगले, सुरेश मानकर, दीपाली कुलकर्णी, हिमगौरी आडके, सुनील देसाई, अलका अहिरे, अविनाश पाटील, देवदत्त जोशी ,तुषार जोशी, उदय रत्नपारखी, संपतराव जाधव, स्मिता जोशी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे शहरातील विविध भागांत जल्लोष करण्यात आला.देवळालीत भाजपाचा जल्लोष गुजरात व हिमाचल प्रदेश येथील निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाल्याने देवळालीत भाजपाच्या वतीने मिठाई वाटप व फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. या यशाचे देवळालीतील रिपाइं नेते विश्वनाथ काळे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन ठाकरे, तालुका अध्यक्ष तानाजी करंजकर, नगरसेवक बाबूराव मोजाड, भगवान कटारिया, महिला शहराध्यक्ष छाया हाबडे, युवा शहराध्यक्ष संतोष मेढे, विभागप्रमुख सतीश कांडेकर, किरण भागवत, तुषार बोडके, मुस्ताक शेख आदींनी जुन्या बसस्थानक परिसरात पेढे वाटत विजयोत्सव साजरा केला.

Web Title: City BJP's election results: Break the crackers and celebrate carnival celebrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा