नागरी बॅँका, पतसंस्थांच्या ठेवींना व्याजदर वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 01:17 AM2018-06-30T01:17:57+5:302018-06-30T01:18:15+5:30

जिल्हा बॅँकेच्या थकबाकीदारांकडे वसुलीसाठी तगादा लावण्याबरोबरच त्यांच्या मालमत्तांवर टाच आणण्याचे प्रयत्न केले जात असले तरी, बॅँकेच्या आर्थिक परिस्थितीत फारसा फरक पडत नसल्याचे पाहून बॅँकेने आता ठेवी वाढविण्यावर भर दिला असून, त्यासाठी गुरुवारी जिल्हा बॅँकेत सर्वच नागरी बॅँकांची बैठक घेऊन त्यात नवीन ठेवींवर व्याजदर वाढवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले आहे.

 Citizen banks, credit institutions will increase interest rates | नागरी बॅँका, पतसंस्थांच्या ठेवींना व्याजदर वाढविणार

नागरी बॅँका, पतसंस्थांच्या ठेवींना व्याजदर वाढविणार

Next

नाशिक : जिल्हा बॅँकेच्या थकबाकीदारांकडे वसुलीसाठी तगादा लावण्याबरोबरच त्यांच्या मालमत्तांवर टाच आणण्याचे प्रयत्न केले जात असले तरी, बॅँकेच्या आर्थिक परिस्थितीत फारसा फरक पडत नसल्याचे पाहून बॅँकेने आता ठेवी वाढविण्यावर भर दिला असून, त्यासाठी गुरुवारी जिल्हा बॅँकेत सर्वच नागरी बॅँकांची बैठक घेऊन त्यात नवीन ठेवींवर व्याजदर वाढवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले आहे.
बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस नागरी सहकारी पतसंस्था, बिगर शेती ग्रामीण सहकारी पतसंस्था, पगारदार सहकारी पतसंस्थांचे चेअरमन व कार्यकारी संचालक उपस्थित होते. व्याजदर वाढीसाठी लवकरच संचालक मंडळाच्या बैठकीत प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे अहेर यांनी सांगितले. यावेळी बोलताना नागरी सहकारी बँक फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा यांनी नाशिक जिल्हा बँक ही आपली मदर बँक असून, बँकेने गरजेच्या वेळी आपल्याला निधी उपलब्ध करून दिलेला असल्याने ज्या बॅँकांना यापुढे निधीची आवश्यकता असेल त्यांनीच निधीची मागणी करावी, असे आवाहन केले. तर नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष भास्करराव कोठावदे यांनी जिल्हा बँकेत परत नव्याने ठेवी ठेवून व्यवहार पूर्ववत सुरू करावे, असे आवाहन केले.
बँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी यावेळी बोलताना महाराष्ट्रातील पहिल्या पाच जिल्हा बँकांमध्ये नाशिक जिल्हा बँकेचे नाव होते; परंतु नोटाबंदी व कर्जमाफीच्या अपेक्षेने वसुली न होऊ शकल्याने आता जिल्हा बँकेस निधीची कमतरता भासत असल्याचे सांगितले. बँकेने कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कर्ज वसुली करून लवकरच बँकेस पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरू असून, लवकरच नागरी बँका व सहकारी पतसंस्था यांनी नवीन ठेवी ठेवल्यास त्यावर व्याजदर वाढविण्यासाठी विचार सुरू असल्याचे ते म्हणाले. यावेळी दत्ता गायकवाड, सुनील ढिकले, अशोक व्यवहार, जगदीश गोडसे, सुरेश पाटील, एस. एन. थोरात आदी उपस्थित होते.

Web Title:  Citizen banks, credit institutions will increase interest rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक