Child death due to leopard attack in Dindori taluka | दिंडोरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू
दिंडोरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू

दिंडोरी : परमोरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गायत्री प्रकाश गांगुर्डे ही चारवर्षीय बालिका मृत्युमुखी पडली.
दीपक साळवे यांच्या शेतात गीताबाई प्रकाश गांगुर्डे, रा.आंबे वरखेडा (कोंबडवाडी) काम करीत होत्या, तर गायत्री खेळत होती. त्याचवेळी उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने गायत्रीवर हल्ला केला व तिला उसाच्या शेतात उचलून घेऊन गेला. त्या हल्ल्यात गायत्री जागीच गतप्राण झाली. या घटनेने गीताबाई खूप घाबरल्यामुळे त्यांचीपण शुद्ध हरपली. त्यांना दवाखान्यात हलविण्यात आले. येथील ही दुसरी घटना आहे. या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला. उपनिरीक्षक प्रवीण पाडवी यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलविण्यात आला. मृताच्या नातेवाइकांचा आक्र ोश मन हेलावून टाकत होता.


Web Title: Child death due to leopard attack in Dindori taluka
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.