कुत्र्याच्या हल्ल्यात एक वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:52 AM2018-02-12T00:52:53+5:302018-02-12T09:59:43+5:30

देवळाली कॅम्प : झोळीत झोपलेल्या एक वर्षीय बालकावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून ठिकठिकाणी चावा घेतल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वडगाव पिंगळा शिवारातील वीटभट्टीवर घडली. बाळाला वाचविण्यासाठी धावलेल्या मातेवरही कुत्र्याने हल्ला चढविल्याने माताही गंभीर जखमी झाली असून, या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांच्या क्रूरतेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.

Child death in a dog attack | कुत्र्याच्या हल्ल्यात एक वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

कुत्र्याच्या हल्ल्यात एक वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

Next
ठळक मुद्देधक्कादायक घटना पिसाळलेल्या कुत्र्याचा मातेवरही हल्ला; बिटको रुग्णालयात उपचार सुरू

देवळाली कॅम्प (नाशिक) : झोळीत झोपलेल्या एक वर्षीय बालकावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून ठिकठिकाणी चावा घेतल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वडगाव पिंगळा शिवारातील वीटभट्टीवर घडली. बाळाला वाचविण्यासाठी धावलेल्या मातेवरही कुत्र्याने हल्ला चढविल्याने माताही गंभीर जखमी झाली असून, या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांच्या क्रूरतेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.
नाशिकरोडपासूनच अगदी जवळ सिन्नर तालुक्यातील वडगाव येथील कारखाना रोडवरील एका वीटभट्टीवर पवार दाम्पत्य काम करीत असताना त्यांच्या समोरच सदर हादरून सोडणारी घटना घडली. ऋषी पवार आणि त्यांची पत्नी जनाबाई पवार हे वीटभट्टीवर काम करीत असताना त्यांनी आपले एक वर्षीय बाळ कांचन याला झाडाला बांधलेल्या झोळीत झोपविले होते. कामात मग्न असतानाच जनाबाई यांना बाळाचा जोरजोरात रडण्याचा आवाज आल्याने त्यांनी धाव घेतली असता पिसाळलेला कुत्रा बाळाचा चावा घेत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी आरडाओरड करीत कुत्र्याच्या तावडीतून बाळाला सोडविण्याचा प्रयत्न केला असता कुत्र्याने त्यांच्या हाताचा लचका तोडून पळ काढला. जनाबाई यांनी जखमी अवस्थेतच बाळाला जवळ घेतले, परंतु बाळाचा रडण्याचा आवाज येत नसल्याने त्यांनी त्याला हृदयशी कवटाळून जोरात हंबरडा फोडला.

त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक मदतीला धावले आणि त्यांनी आई आणि बाळ या दोघांनाही नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र बाळाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून, पवार कुटुंबिय अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाही.बिबट्यांची भीती, आता कुत्र्यांची दहशतशहरालगतच्या शेती आणि मळे परिसरात बिबट्यांचा संचार असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. गावातील नागरिकही प्रत्यक्षदर्शी आहेत. भगूर, लहवित, नाणेगाव परिसर असो की शिंदे, पळसे, पंचवटी परिसरातील मळे तसेच पाटाचा परिसर, सातपूर जवळच्या पिंपळगाव खांब असे शहराच्या चारही बाजूला बिबट्याचे वास्तव्य आढळून येत असल्याने बिबट्याची भीती आहे. त्यामुळे शेतावर काम करण्यासही मजूर घाबरत असतात. आता तर कुत्र्यांची भीती वाढल्याचे नागरिकांनी सांगितले. शहरातील कुत्रे गावात?ाानेगाव-वडगाव मळे परिसरात महापालिकेने सोडलेल्या मोकाट कुत्र्यांनी कांचनचा बळी घेतल्याचा आरोप आता परिसरातील नागरिक करीत आहेत. पंचक्रोशीत अनेक गावांतील नागरिकांची मोकाट कुत्र्यांविषयी तक्रार असताना महापालिकेनेच असे मोकाट कुत्रे सोडताना खबरदारी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Child death in a dog attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.